मुंबई | नगर सह्याद्री
मराठवाड्यासह विदर्भातील वाशिम जिल्ह्याला सकाळीच भूकंपाने हादरवले. त्यामुळे नागरीक भयभीत झाले. अनेकांनी खुल्या जागांकडे धाव घेतली. हिंगोली, परभणी, नांदेडसह वाशिम जिल्ह्याला भूकंपाचे धक्के जाणवले. सकाळी ०७:१४ वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपची तीव्रता रिश्टर स्केल वर ४.५ नोंदविण्यात आलेली आहे. प्रशासनाने खबरदारी घेतली आहे. सकाळीच प्रशासकीय यंत्रणेने या भूकंपाची तीव्रता आणि कुठे हानी झाली का याचा आढावा घेतला आहे. नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
सकाळी नांदेड परभणी हिंगोली या जिल्ह्यांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. सकाळी ७.१४ वाजता भूकंपाचा धक्का जाणवला. नांदेड मध्ये भूकंपाची ४ पूर्णांक ०५ अशी रिस्टर स्केलवर नोंद झाली आहे. या धयांने नागरिक भयभीत झाले असून घराबाहेर आले आहेत.
विदर्भातील वाशिम जिल्ह्यासह हिंगोली, परभणी, नांदेड, छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्ह्यातील काही भागातही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. पैठण तालुयातील पाचोड येथे सकाळी ७:१५ मिनीटाला धक्के जाणवले. जालना जिल्ह्यातील अंबड तालुयातही भूंकपाचे धक्के जाणवले. परभणी शहर, सेलू, गंगाखेड, हिंगोलीतील पिंपळदरी, राजदरी, वसमत भागाला सकाळीच भूकंपाचे धक्के जाणवले. २ महिन्यांपूर्वी सुद्धा या भागात भूकंपाचे धक्के जाणवले होते. वसमत तालुयातील पांगरा शिंदे आणि आजूबाजूच्या भागात जमिनीतून गूढ आवाज येत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली होती. तर रामेश्वर तांडा भागतही भूंकपाचे हादरे बसले होते.