spot_img
देशएसटी बँकेत महाभूकंप, 12 संचालकांचा तडकाफडकी राजीनामा

एसटी बँकेत महाभूकंप, 12 संचालकांचा तडकाफडकी राजीनामा

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री : राज्यात सातत्याने विविध घडामोडी घडत आहेत. आता एक अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे. एसटी महामंडळाच्या स्टेट ट्रान्सपोर्ट को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडमध्ये महाभूकंप झाला असून एसटी बँकेच्या 19 पैकी 12 संचालकांनी तडकाफडकी राजीनामा दिला असल्याची माहिती मिळाली आहे.

प्रसिद्ध वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या एसटी महामंडळातील अस्तित्वाला फार मोठा धक्का बसला असल्याचे बोलले जात आहे. या राजीनामा सत्रामुळे एसटी महामंडळातील सदावर्ते यांचं वर्चस्व खालसा झालं असून राजीनामा सत्रामुळे एसटी महामंडळात एकच खळबळ उडाली असल्याचे चित्र आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावेळी गुणरत्न सदावर्ते यांनी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचं नेतृत्व केलं होत. त्यानंतर एसटी महामंडळाच्या निवडणुकांमध्ये आपलं पॅनल उतरवत एसटी बँकेची संचालक मंडळाची निवडणूक लढवली.

यात त्यांच्या पॅनलला 19 पैकी 12 जागांवर विजय मिळाला होता. दरम्यान आता एसटी बँकेच्या 19 पैकी 12 संचालकांनी पदाचा राजीनामा दिला आहे. या सर्व संचालकांनी गुणरत्न सदावर्ते यांच्या पॅनलला सोड चिठ्ठी दिल्याचं सूत्रांनी सांगितलं

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लाडक्या बहिणींना १५०० मिळणार की २१००? मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टच सांगितले…

मुंबई / नगर सह्याद्री - Ladki Bahin Yojana 6th Installment: लाडकी बहीण योजनेचा पुढील...

अहिल्यानगरमध्ये खळबळजनक प्रकार?; एटीएममध्ये ‘हेराफेरी’

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री :- केडगाव येथील एका नामांकित बँकेच्या एटीएमला पटटी चिटकवत 40 हजार रुपयांची...

कांदा कोसळला; शेतकरी आक्रमक

सोलापूर-नाशिकमध्ये लिलाव बंद | मनमाड-येवला महामार्गावर रास्तारोको नाशिक | नगर सह्याद्री गेल्या 10 दिवसांत कांद्याचे क्विंटल...

मनपाचे दोन कर्मचारी निलंबित; कारण आलं समोर..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- महापालिकेच्या मार्केट विभागातील कथित हप्तेखोरीच्या समाजमाध्यमातून प्रसारित झालेल्या ध्वनिफितीसंदर्भात आयुक्त तथा...