spot_img
ब्रेकिंगमहाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप; चव्हाणांनी सोडला 'हात'; कोण काय म्हणाले पहा?

महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप; चव्हाणांनी सोडला ‘हात’; कोण काय म्हणाले पहा?

spot_img

मुंबई | नगर सह्याद्री – 
MAHARASHTRA CONGRESS राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण ASHOK CHAVHAN यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. त्यांच्या कार्यकर्त्यांनी सोशल मिडीयावर स्टेटस ठेवल्यामुळे त्यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरू झाली आहे. ते नॉट रिचेबल असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
अशोक चव्हाण यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्याच्या चर्चा सुरू आहेत. नांदेडमध्ये राजकीय भूकंप झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्ष सोडला तर काँग्रेसला मोठा धक्का असणार आहे. मोठ्या काँग्रेस नेत्याच्या पक्षप्रवेशाची तयारी भाजप करत असल्याच्या चर्चा देखील सुरू आहेत.

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र काँग्रेसमधील मातब्बर नेत्यांमध्ये अशोक चव्हाण यांची ओळख आहे. अशोक चव्हाण लवकरच मोठा राजकीय निर्णय घेण्याची शयता असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. अशोक चव्हाण यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आहे. त्याचबरोबर अशोक चव्हाण यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेऊन चर्चाही केली. ते सध्या नॉट रिचेबल असल्याच्या चर्चा आहेत. राहुल नार्वेकर यांचा रविवारी वाढदिवस होता.

त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मी नार्वेकरांना भेटलो, असे अशोक चव्हाणांकडून सांगण्यात आले. मात्र, आगामी राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करु शकतात, अशी शयता आहे. अशोक चव्हाण यांच्या अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकार्‍यांनी ’भावी खासदार’ असा उल्लेख करत अशोक चव्हाण यांचे स्टेटस ठेवले आहेत. दरम्यान, काँग्रेस सदस्यत्त्वाचा राजीनामा दिल्याने काँग्रेसमध्ये खळबळ उडाली असून, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यावर निर्णय घेण्यासाठी आणि डॅमेज कंट्रोलसाठी श्रेष्ठींकडे जाणार असल्याची चर्चा आहे.

आगे आगे देखीए… फडणवीस
फडणवीस यांनी काही वेळापूर्वी पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत फडणवीस म्हणाले, काँग्रेसमधील अनेक चांगले नेते भाजपच्या संपर्कात आहेत. ज्याप्रकारे काँग्रेस पक्ष गेले काही वर्ष वाटचाल करत आहे. त्यातून जनतेशी घट्ट जोडलेल्या नेत्यांची सध्या घुसमट होत आहे. त्यामुळे देशभरातील काँग्रेसचे लोकनेते भाजपात प्रवेश करत आहेत. काही मोठे नेते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे मी आता एवढेच म्हणेन, आगे आगे देखिये होता है या

व्हायरल होणारे पत्र…
अशोक चव्हाण यांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर शिक्कामोर्तब करणारे एक पत्र समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. या पत्रात चव्हाण यांच्या नावापुढे माजी विधानसभा सदस्य असा उल्लेख आहे. याचाच अर्थ चव्हाण यांनी आधीच विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला असावा. त्यापाठोपाठ त्यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. नाना पटोल यांना लिहिलेल्या पत्रात अशोक चव्हाण म्हणतात, मी दिनांक १२ फेब्रुवारी २०२४ मध्यान्हापासून माझ्या इंडियन नॅशनल काँग्रेस (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस) पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा या पत्राद्वारे सादर करत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘वारकरी’ शब्द कसा झाला तयार?, वाचा पंढरीच्या वारीचा इतिहास

नगर सहयाद्री टीम: "विठू नामाचा गजर, टाळ-मृदुंगांचा निनाद आणि माउली-माउलीचा जयघोष" याने आसमंत भारून...

आनंदवार्ता, दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रिय होणार; ‘या’ जिल्ह्यात धो धो बरसणार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांत पुढील चार दिवस दमदार पाऊस होणार असल्याचा...

महिला भजनात दंग, भामट्यांनी दाखवले रंग!, १०० ग्रॅम सोने लंपास..

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री   बंद घराच्या खिडकीची जाळी तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे आठ तोळ्याचे सोन्याचे...

‘कुख्यात गुन्हेगार बंटी राऊत स्थानबद्ध’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील माणीक चौक, लाटे गल्ली येथील उख्यात गुन्हेगार बंटी उर्फ भावेश...