spot_img
महाराष्ट्रकाँग्रेसमध्ये भूकंप ! बाबा सिद्दीकी राष्ट्रवादीत

काँग्रेसमध्ये भूकंप ! बाबा सिद्दीकी राष्ट्रवादीत

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री : महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक मोठा ट्विस्ट आला आहे. काँग्रेसमध्ये खळबळ उडवून देणारी बातमी आली आहे. ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेसला राम राम ठोकला आहे.

ते अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सहभागी होणार आहेत. बाबा सिद्दीकी यांनी ट्विट करून ही माहिती दिली असून ते परवा १० फेब्रुवारीला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल होतील.

बाबा सिद्दीकी यांनी म्हटले आहे की, मी तरुणपणात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सामील झालो. गेल्या 48 वर्षांचा काँग्रेस सोबतचा माझा महत्त्वाचा प्रवास राहिला आहे. आज मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे.

मला या प्रवासाबद्दल बोलायला खूप आवडले असते. पण म्हणतात ना काही गोष्टी न सांगितल्या बऱ्या. माझ्या या प्रवासात सहभागी झालेल्या सर्वांचे मी आभार मानतो.

कोण आहेत बाबा सिद्दीकी
मुंबई काँग्रेसमधील बाबा सिद्दीकी मोठे नेते आहेत. मुस्लिम चेहरा म्हणून ते राजकारणात प्रसिद्ध आहेत. तीन वेळा ते वांद्रा येथून आमदार राहिले आहेत. विद्यार्थी नेते म्हणून त्यांनी राजकारणात प्रवेश केला. त्यानंतर मुंबई महापालिकेत नगरसेवक बनले. त्यानंतर 1999, 2004 आणि 2009 मध्ये वांद्रे मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून गेले. त्यांनी मंत्रीपदाची जबाबदारी सांभाळली. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्याकडून बाबांचा पराभव झाला होता.

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

हैदराबाद गॅझेट संदर्भात हाय कोर्टाचा मोठा निर्णय, काय दिलाय निर्णय?

मुंबई / नगर सह्याद्री मराठा समाजाला दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. हैदराबाद गॅझेटच्या...

…तर लक्ष्मण हाकेंना रस्त्यावर ठोकू, लेकीबाळीची इज्जत काढतोय; मराठा क्रांती मोर्चाचा इशारा

मुंबई / नगर सह्याद्री - ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केलेल्या लग्नाच्या वक्तव्यावरून राजकाराण तापलं...

आयुक्त आक्रमक; कत्तलखान्यांवर जेसीबी फिरवला, पुढे घडले असे…

झेंडीगेटमध्ये तगडा पोलिस बंदोबस्त | मोहीम आणखी तीव्र करण्याची मागणी अहिल्यानगर | नगर सह्याद्री नगर शहरातील...

नगरमध्ये तलाठी लाच घेताना पकडला, असा अडकला सापळ्यात

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई सुपा | नगर सह्याद्री पारनेर तालुक्यातील वाडेगव्हाण येथील तलाठी दीपक भिमाजी साठे...