प्रवासी झाले जखमी; मोठा अनर्थ टळला
पारनेर / नगर सह्याद्री
पारनेर येथून मुंबईकडे जाणारी एसटी बस ब्रेक निकामी झाल्याने थेट बस स्थानकाच्या आतमध्ये घुसल्याने प्रवाशांची एकच पळापळ झाली. या अपघातात एक प्रवासी जखमी झाला असून, मंगळवारी रात्री सव्वासात वाजता ही घटना घडली.
या अपघातात बस स्थानकाचे मोठे नुकसान झाले आहेत. या घटनेत करंदी येथील शंकर ठाणगे हा प्रवासी जखमी झाला आहे. पारनेर-मुंबई दैनंदिन फेरीसाठी पारनेर आगारातून बस क्रमांक एमएच १४ बीटी ४२८०) ही रात्री ७:१५ वाजता बाहेर पडली. बस स्थानकावरील प्लॅटफॉर्मवर बस लावण्यासाठी चालक घेऊन जात होता.
याचवेळी प्रवासी बसलेल्या स्थानकात ही बस घुसल्याने एकच गोंधळ उडाला. या घटनेवेळी पारनेर स्थानकात ३० ते ४० प्रवासी उपस्थित होते. प्रसंगावधान राखत प्रवासी बाजूला झाल्याने ते अपघातातून वाचले. ब्रेक निकामी झाल्याने नियंत्रण सुटल्याचे चालकाने सांगितले.