spot_img
अहमदनगर'डॉ. विखे पाटील फाउंडेशनच्या परिचर्या महाविद्यालयात राष्ट्रीय परिषद'

‘डॉ. विखे पाटील फाउंडेशनच्या परिचर्या महाविद्यालयात राष्ट्रीय परिषद’

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री
डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनच्या परिचर्या महाविद्यालयात ८ ऑक्टोबर २०२४ रोजी “बहुउद्देशीय न्यायवैद्यक परिचारिका: कायद्याची अंमलबजावणी आणि आरोग्य सेवा” या विषयावर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले. या परिषदेचे प्रमुख अतिथी म्हणून राकेश ओला (पोलीस अधीक्षक, अहमदनगर) आणि वसंतराव कापरे (विश्वस्थ, डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन) उपस्थित होते.

महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. प्रतिभा अरुण चांदेकर यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले व परिषदेची प्रस्तावना सादर केली. या परिषदेत न्यायवैद्यक परिचारिका, पुरावे संकलन, पीडितांचे समुपदेशन आणि कुटुंबास आधार देण्याच्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. विविध तज्ज्ञांनी आपल्या व्याख्यानांद्वारे फॉरेन्सिक नर्सिंग आणि न्यायवैद्यक शास्त्रावर सखोल माहिती दिली.

डॉ. जयदीपा आर. (प्राचार्य, आय.क्यू.टी.सी., पश्चिम बंगाल) यांनी पुरावे गोळा करण्यात परिचारिकांची भूमिका स्पष्ट केली. प्रा. डॉ. व्ही.डी. पंडारे (न्यू लॉ कॉलेज, अहमदनगर) यांनी सिव्हिल आणि क्रिमिनल कायद्यांवर विचार मांडले. तसेच, अनेक मान्यवरांनी विविध विषयांवर आपले विचार व्यक्त केले.

या परिषदेच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाच्या विविध शिक्षक व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. परिषदेचा समारोप विजेत्यांना पारितोषिक देऊन करण्यात आला. परिषदेत २५८ प्रत्यक्ष आणि ११० ऑनलाइन विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राजीनामा! महाराष्ट्राचे नवे मंत्री ठरले?, ‘हे’ बडे नेते शर्यतीत, वाचा यादी..

मुंबई । नगर सहयाद्री:- राज्यात विधानसभेचा कार्यकाळ संपला आहे. त्यामुळे आता नवीन सरकार स्थापन करावे...

नगर शहरात Hit And Run ; मद्यधुंद ड्रायव्हरची नागरिकांना धडक, एक ठार, चौघे गंभीर…

Hit And Run: अहिल्यानगर शहरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. अहिल्यानगर शहरात हिट...

गुरुजी तसलं वागणं बर नव्ह! विद्यार्थिनीशी नेमकं काय घडलं? केली निलंबनाची मागणी..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- जिल्ह्यातील अकोला तालुक्यातील एका महाविद्यालयीन प्राध्यापकाने विद्यार्थिनीशी अश्लील चॅटिंग केल्याचा प्रकार...

आजचे राशी भविष्य; ‘या’ पाच राशींना मिळणार खुशखबर, तुमची रास काय?, वाचा..

मुंबई । नगर सहयाद्री:- मेष राशी भविष्य तुमच्या अवतीभवतीचे लोक खूप कामाचा अपेक्षा तुमच्याकडून करतील -...