अहमदनगर। नगर सहयाद्री-
शहरात कॅफे शॉपच्या नावावर अनोखा कारभार सुरु असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कॅफे शॉपच्या प्लायवूडच्या कंपार्टमेंटमध्ये काळे पडदे लावून मुला-मुलींना अश्लील चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करुन दिल्या प्रकरणी चालकांच्या विरोधात तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पंपिंग स्टेशन रस्ता, ताठेनगर येथे गोल्ड स्टार कॅफेच्या नावाखाली विविध गाळ्यांमध्ये प्लायवुडचे कंम्पार्टमेंट करून, पडदे लावुन अंधार केला असून तेथे शाळा, कॉलेजमधील मुला-मुलींना अश्लिल चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली असल्याची माहिती मिळाली होती.
पथकाने शनिवारी (दि. २०) दुपारी सदर कॅफेबर छापा टाकून कारवाई केली आहे.ओंकार कैलास ताठे (वय २३ रा. ताठेनगर, सावेडी) असे गुन्हा दाखल झालेल्या कॅफे चालकाचे नाव आहे.