spot_img
अहमदनगर'देख लो आखो से..मराठे आऐ लाखोसे'!! दुमदुमली नगरी तर सुपेकरांचे १७० एकरात...

‘देख लो आखो से..मराठे आऐ लाखोसे’!! दुमदुमली नगरी तर सुपेकरांचे १७० एकरात नियोजन

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री

संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संपुर्ण राज्यात वेगवेगळ्या स्वरूपाची आंदोलने उभारली होती मात्र तरी देखील मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सुटला नाही? मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई येथील आझाद मैदानावर उपोषण करण्यासाठी लाखो समाज बांधवांच्यासह मुंबईकडे कुच केली आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी काढलेल्या दिंडीचा आजचा तिसर दिवस आहे. रविवारी सकाळी मातोरी गावातून निघालेले मनोज जरांगे रात्री उशिरा बाराबाभळी येथे पोहचले. रात्रीचा मुक्काम करून जरांगे नगरमध्ये येणार आहे. मनोज जरांगे यांच्या स्वागतासाठी नगरकर सज्ज झाले असून सुपा येथे दुपारच भोजन तसेच रांजणगावयेथे आजचा रात्रीचा मुक्काम असणार आहे.

मराठा आदोलकांनी दुमदुमली नगरी

आज सकाळ पासुनच मराठा बांधवांचे नगर शहरामध्ये आगमन होत आहे. मराठा आरक्षण पदयात्राचे स्वागत करण्यात येत असून ठिकठिकाणी सकाळच्या नाष्टयाची, चहा पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.  एक मराठा! लाख मराठा!!, देख लो आखो से..! मराठे आऐ लाखोसे! अशा प्रकारच्या घोषणांनी परिसर दुमदुला आहे.

सुप्यात ६ लाख आदोलकांच्या जेवणाचे नियोजन

मराठा समाजाच्या वतीने सुमारे १७० एकर क्षेत्रावर मराठी बांधवांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली असून लापशी व मसाला भात महाभोजनाचे तर श्रीगोंदा तालुका मराठा समाज व आमदार राहूल जगताप यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चात सुमारे ५ ते ६ लाख मराठा बांधव सहभागी होतील असा अंदाज संयोजकांनी व्यक्त केला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

डॉल्बी डीजे अन् लेसर लाईट्सचं काय?

पोलिसांच्या भूमिकेकडे लक्ष | जाताजाता बाप्पा म्हणाला; पुढच्या वर्षी नव्हे रे, रोजच भेटणार मी...

खा. नीलेश लंके यांना पत्र दिलेच नाही?; आ. टिळेकर यांच्याकडून ‘इन्कार’

पारनेर | नगर सह्याद्री:- मी भाजपाचा निष्ठावान कार्यकर्ता आहे. विधान परिषदेचा आमदार म्हणून मी राज्यात...

‘मुस्लीम समाजाचे नाव मतदार यादीतून कमी करण्याचे षडयंत्र’

अहमदनगर । नगर सहयाद्री:- शासनाला हाताशी धरून काही विघ्नसंतोषी लोक मुस्लीम समाजाचे नाव मतदार यादीतून...

बिबट्याच्या हल्ल्यात सात शेळ्या गेल्या; ‘या’ परिसरात ‘तीन’ बिबटे

पारनेर । नगर सहयाद्री :- तालुक्यातील पठार भागावरील गारगुंडी येथे गावाजवळील शेख वस्तीवरील आमीनभाई शेख...