spot_img
महाराष्ट्रठाण्याच्या दाढीला हलक्यात घेऊ नका! शिवसेना नेत्याचा कुणाला सूचक इशारा?

ठाण्याच्या दाढीला हलक्यात घेऊ नका! शिवसेना नेत्याचा कुणाला सूचक इशारा?

spot_img

मुंबई । नगर सहयाद्री:-
महाराष्ट्रात सध्या सत्तास्थापनेचा पेच कायम आहे. महायुतीला बहुमत मिळालेलं असताना अद्याप मुख्यमंत्री कोण होणार? हे निश्चित झालेले नाही. तर दुसरीकडे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची चर्चा रंगली आहे. राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दुपारी साता-यातील दरे गावातून मुंबईला पोहचणार आहेत.

ते मुंबईत महायुतीच्या नेत्यांची भेट घेणार आहेत. दरम्यान शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि छत्रपती संभाजीनगर पश्चिम मतदारसंघाचे आमदार संजय शिरसाट यांनी सूचक वक्तव्य केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. संजय शिरसाट यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

आमदार शिरसाट म्हणाले, शेतकऱ्याच्या मुलाचा अपमान करणं एवढं एकच काम संजय राऊतला आहे. संजय राऊतांमुळेच शिवसेना ठाकरे पक्ष संपला. संजय राऊतांमुळेच पवार यांच्या पक्षाला फटका बसला आणि अजूनही त्याची बडबड सुरूच आहे. आमच्या समन्वयाचा कुठलाही अभाव नाही तिन्ही पक्षाचे नेते एकत्र बसतील आणि कुठली जागा कुणाला द्यायची कुठले खाते कुणाला वाटप करायचे याबद्दल संधी दिली जाईल. योग्य चर्चा होईल.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जेव्हा जेव्हा दाढीवरून हात फिरवत आहे, तेव्हा तेव्हा राष्ट्रामध्ये मोठ्या काहीतरी घडतं. त्यामुळे ठाण्याच्या दाढीला हलक्यात घेता कामा नये. हेच हलक्यात घेण्याचं काम ठाकरेंनी केलं आणि आता त्यांची काय अवस्था आम्ही करून ठेवली हे महाराष्ट्राने पाहिला. त्यामुळे जेव्हा ते येतील त्यानंतर सगळ्या घडामोडी घडतील. त्यांना कोणी हलक्यात घेता कामा नये, जर घेतलं तर मग राऊतांची काय अवस्था केली, त्यांच्या पक्षांची काय अवस्था केली हे तर सगळ्यांना माहितीच आहे, असा सूचक इशारा संजय शिरसाट यांनी दिला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

महापालिका वॉर्ड रचनेची प्रतीक्षा संपली; तीन वॉर्डात काय आणि कसे झाले बदल पहा

महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचनेला राज्य निवडणूक आयोगाची मान्यता एक हरकत अंशतः मान्य; महानगरपालिकेच्या...

भाजपाचे जेष्‍ठ नेते स्‍व.आ.शिवाजीराव कर्डीले यांना श्रध्‍दांजली अर्पण करण्‍यासाठी सर्वपक्षिय शोकसभेचे आयोजन

अहिल्‍यानगर / नगर सह्याद्री - भाजपाचे जेष्‍ठ नेते स्‍व.आ.शिवाजीराव कर्डीले यांना श्रध्‍दांजली अर्पण करण्‍यासाठी सर्वपक्षिय...

राखेतून फिनिक्ससारखी भरारी — माजी सैनिक नवनाथ खामकर यांचा संकल्प एस. मार्ट पुन्हा उभा

  श्रीगोंदा / नगर सह्याद्री - राखेतून पुन्हा जन्म घेणाऱ्या फिनिक्स पक्षासारखी किमया श्रीगोंद्यात पाहायला मिळाली...

स्थानिक स्वराज्य संस्थांनच्या निवडणुका संभाजी ब्रिगेड ताकदीने लढवणार – इंजी. शामभाऊ जरे

श्रीगोंदा / नगर सह्याद्री दिवाळीनंतर होणाऱ्या नगरपरिषद, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी संभाजी ब्रिगेड...