spot_img
मनोरंजनमुलींनो गप्प बसू नका; अभिनेत्री रश्मिका मंदाना असे का म्हणाली?

मुलींनो गप्प बसू नका; अभिनेत्री रश्मिका मंदाना असे का म्हणाली?

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री – actress Rashmika Mandana अभिनेत्री रश्मिका मंदाना कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमी चर्चेत असते. आताही पुन्हा अ‍ॅनिलम या चित्रपटामुळे चर्चेत आली आहे. अशातच डीपफेक प्रकरणामुळेतर आणखीच चर्चेत आहे. अभिनेत्री सध्या आगामी अ‍ॅनिमल या चित्रपटामुळे चर्चेत आली आहे. १ डिसेंबरला चित्रपट प्रदर्शित होत आहे. त्यामुळे सर्व टीम या चित्रपटाचे ठिकठिकाणी प्रमोशन करण्यात व्यस्त आहे.

याच दरम्यान अभिनेत्री रश्मिका मंदानाचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यामध्ये अभिनेत्री रश्मिका डीपफेक प्रकरणावरुन बोलताना दिसून येत आहे. अ‍ॅनिमल चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यानचा हा व्हिडीओ आहे. या प्रमोशनादरम्यान डीपफेक व्हिडीओविषयी विचारण्यात आले.

तेव्हा रश्मिका म्हणते, मी जेव्हा पहिल्यांदा डीपफेक व्हिडीओ पाहिला तेव्हा मी खूप घाबरले होते. मला वाटलं माझ्या टीमकडून मला कुठलाही पाठिंबा मिळणार नाही. सर्वात पहिल्यांदा पाठिंबा देणारे व्यक्ती अमिताभ बच्चन होते. त्यानंतर अनेक जण मला पाठिंबा देण्यासाठी पुढे सरसावले. त्याने मला सपोर्ट मिळाला.

सुरुवातीला डीपफेक व्हिडीओचा माझ्यावर खूप परिणाम झाला. हा डीपफेक सर्वसाधारण व्हिडीओ नसतो त्यामुळे मी यावर बोलण्याचा निर्णय घेतला. मी जगभरातल्या सर्व मुलींना सांगू इच्छिते की, हे सामान्य नाहीये. जर एखाद्या गोष्टीचा तुमच्यावर परिणाम होतोय तर गप्प बसण्याची गरज नाही. तुम्ही त्यावर प्रतिक्रिया देऊ शकता आणि लोकं तुम्हाला पाठिंबा देतील. ते मी धाडस केले. दरम्यान, रश्मिका मंदानानंतर, कतरिना कैफ आणि काजोलाचा डीपफेक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर आता सध्या आलिया भट्टचा डीपफेक व्हिडीओ चर्चेत आला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नालायक सरकार… मनोज जरांगे पाटील कडाडले, थेट केले गंभीर आरोप..

बीड / नगर सह्याद्री - मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील आणि माजी मंत्री...

ऐन निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शेकडो पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

नाशिक / नगर सह्याद्री : येथील इगतपुरीमध्ये ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना (शिंदे गट) ला...

​हुंड्यासाठी विवाहितेचा छळ; पतीसह सासरच्या चौघांविरुद्ध गुन्हा, कुठे घडला प्रकार पहा

​अहिल्यानगर / नगर सह्याद्री - माहेरहून राहिलेल्या हुंड्याच्या पैशांची मागणी करत, तसेच चारित्र्यावर संशय...

खारेकर्जुनेतील नरभक्षक बिबटे जेरबंद; ग्रामस्थांनी केला विरोध, काय काय घडलं

एक पिंजर्‍यात अडकला | दुसर्‍याला विहिरीतून बाहेर काढला | ठार मारण्याच्या भूमिकेवर ग्रामस्थ ठाम अहिल्यानगर...