spot_img
अहमदनगरAhmednagar : नुकसानग्रस्तांची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी बांधावर, दिले 'हे' महत्वाचे निर्देश

Ahmednagar : नुकसानग्रस्तांची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी बांधावर, दिले ‘हे’ महत्वाचे निर्देश

spot_img

पारनेर / नगर सह्याद्री : पारनेर तालुक्यातील निघोज मंडळातील ज्या गावात गारपीटीमुळे नुकसान झाले आहे त्या गावातील जनावरांसाठी चाऱ्याची व्यवस्था तातडीने करण्यात येईल. तसेच ज्या गावात अतीवृष्टी व गारपीट झाली त्या गावातील प्रत्येक शेतकऱ्याच्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे केले जातील अशी माहीती जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिली.

मंगळवारी सायंकाळी पारनेर तालुक्यातील पानोली, वडूले व सांगवी सुर्या या गावातील अतीवृष्टी व गारपीटग्रस्त गावांतील शेतकऱ्यांच्या पीकांच्या नुकसानीची पहाणी जिल्हाधिकारी सालीमठ यांनी केली. त्या वेळी ते शेतक-यांशी बोलत होते. या वेळी त्यांच्या समावेत प्रातांधिकारी गणेश राठोड, तहसीलदार गायत्री सैंदाणे, भाजपाचे तालुका अध्यक्ष राहुल शिंदे पाटील, माजी पंचायत समिती सदस्य डॉ.श्रीकांत पठारे, सुप्याचे माजी सरपंच दत्तात्रेय पवार, नायब तहसीलदार गणेश आढारी, सुभाष कदम, तसेच संजय मते, बी.ए.भगत, लहू भालेकर, पंकज कारखिले आदींसह शेतकरी मोठ्या संखेने उपस्थीत होते.

या वेळी जिल्हाधिकारी सालीमठ म्हणाले, शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. ज्या शेतकऱ्यांचे शेती पीके व फळबागांचे व कु्कुटपालनाचेही नुकसान झाले आहे. अनेकांच्या घरांची पडझड झाली आहे. या सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे केली जातील.

थेट शेवटच्या शेतक-यापर्यंत नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश पंचनामे करण्यासाठी नेमलेल्या संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. पंचनामे करताना कोणालाही वगळले जाणार नाही. तसेच अतीवृष्टीमुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न उपस्थीत झाला आहे. त्यामुळे जनवरांसाठी तातडीने चाऱ्याची व्यवस्था करण्यात येईल असेही ते म्हणाले.

गारपीटग्रस्तांना तातडीने मदत द्यावी
पंचनामे करून तातडीने शेतकऱ्यांना मदत मिळावी. तालुक्यातील खरीप हंगाम वाया गेला आहे व आता रब्बीचीही पीके गारपीटीमुळे वाया गेली आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीने व जास्तीजास्त मदत मिळावी – राहुल शिंदे पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘नीट’ परीक्षेत कमी गुण मिळाल्याने मुख्याध्यापकाने घेतला लेकीचा जीव, कुठली घटना पहा

सांगली / नगर सह्याद्री : सांगली जिल्ह्यात ‘नीट’च्या सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे १६ वर्षीय...

‘जिजाऊ ब्रिगेड’चा हुंडाबळी रोखण्याचा संकल्प, पहा सविस्तर

महाराष्ट्र जिजाऊ ब्रिगेडच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आढावा बैठक अहिल्यानगर | नगर सह्याद्री अहिल्यानगर येथे जिजाऊ ब्रिगेड...

“युद्ध तुम्ही सुरू केलं, पण आता… ; इराणचा अमेरिकेला कडक इशारा

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या इराण-इस्रायल लष्करी संघर्षात काल...

साईभक्तांसाठी आनंदाची बातमी: आता वेळ वाचणार, संस्थानकडून नवा निर्णय

शिर्डी / नगर सह्याद्री - साई संस्थानच्या या निर्णयामुळे सामान्य साईभक्तांना मोठा दिलासा मिळणार...