spot_img
आर्थिकसिलेंडर भरताना गॅस एजन्सी जास्त पैसे घेते का? 'येथे' करा तक्रार, लगेच...

सिलेंडर भरताना गॅस एजन्सी जास्त पैसे घेते का? ‘येथे’ करा तक्रार, लगेच लागेल निकाल

spot_img

नगर सहयाद्री टीम :
सध्या नागरिकांना महागाईचा सामना करावा लागत आहे. अनेक गोष्टींमध्ये भाव वाढल्या आहेत. घरगुती सिलिंडरच्या दरातही मोठी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक महागाईने त्रस्त झाले आहेत.यात भर म्हणून की काय काही गॅस एजन्सीजकडून सिलिंडरसाठी जादा पैसे आकारून ग्राहकांना लुबाडले जात आहे. घरगुती सिलिंडरसाठी तुमच्याकडून ठरवून दिलेल्या रक्कमेपेक्षा जास्त पैसे आकारले जात असतील तर तुम्ही त्याविरोधात तक्रार नोंदवू शकता.

घरगुती सिलिंडरसाठी ठरवून दिलेल्या रकमेपेक्षा जास्त पैसे आकारले जात असतील तर त्याविरोधात तक्रार दाखल करू शकता. शहर व जिल्ह्यात इतरत्र गॅस एजन्सीचालक व मालक ग्राहकांना त्रास देतात, मनमानी करतात, सिलिंडर पटकन देत नाहीत, जादा प्रमाणात देतात, असे आरोप नेहमीच केले जातात. त्यात तथ्य आहे, पण ही माहिती असूनही गॅस ग्राहक हा ग्राहक पंचायतीकडे धाव घेत नाहीत आणि न्याय मिळवण्याचा प्रयत्नही करत नाहीत, अशी खंत ग्राहक पंचायतीने व्यक्त केली.

सध्याच्या काळात असे दिसते की, काही गॅस एजन्सीजकडून सिलिंडरसाठी जादा पैसे आकारून ग्राहकांना लुबाडले जात आहे. घरगुती सिलिंडरसाठी तुमच्याकडून ठरवून दिलेल्या रक्कमेपेक्षा जास्त पैसे आकारले जात असतील तर तुम्ही त्याविरोधात तक्रार नोंदवू शकता. त्यासाठी तुम्हाला केवळ एक ट्विट करावे लागेल. त्यानंतर MoPNG e-Seva या सरकारी विभागाकडून संबंधित एजन्सीवर योग्य ती कारवाई केली जाईल.

तसेच तुम्ही एजन्सीकडून वेळेवर सिलिंडर घरी पोहोचवला जात नसल्यास एजन्सी लगेच बदलू शकता. केंद्र सरकारच्या नव्या धोरणानुसार, खादा ग्राहक त्यांच्या गॅस एजन्सीकडून देण्यात येणाऱ्या सेवेच्या दर्जाविषयी समाधानी नसेल तर तो दुसऱ्या गॅस एजन्सीत कनेक्शन ट्रान्सफर करु शकतो. सुरुवातीच्या काळात ही सुविधा फक्त एकदाच वापरता येईल. ज्याप्रमाणे रेशन कार्डधारकाला त्याचे दुकान किंवा डिलर बदलण्याची सुविधा आहे, तसेच या सुविधेचे स्वरुप आहे.

ही सुविधा सुरुवातीला चंदीगड, पुणे, कोईम्बतूर आणि गुडगावमध्ये सुरु केली जाईल. त्यानंतर टप्याटप्प्याने देशभरात ही सुविधा मिळेल. जर तुमचा गॅस रेग्युलेटर एखाद्या कारणामुळे खराब झाला असेल तर गॅस एजन्सी तोही बदलून देते. परंतु, यासाठी एजन्सी कंपनीच्या टेरिफप्रमाणे तुमच्याकडून ठराविक रक्कम जमा करुन घेते. ही रक्कम 150 रुपयांपर्यंत असू शकते. जर तुमचा रेग्युलेटर चोरीला गेला आणि तुम्हाला एजन्सीकडून नवीन रेग्युलेटर पाहिजे असेल तर त्यासाठी तुम्हाला पोलिसांत एफआयआर दाखल करावा लागेल. एफआयआरची पत जमा केल्यानंतर एजन्सी तुम्हाला रेग्युलेटर बदलून देईल.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मांडओहळ धरणातून उद्या आवर्तन सुटणार ; आ. काशिनाथ दातेंच्या अधिकाऱ्यांना सूचना

पारनेर / नगर सह्याद्री - सोमवार दि. २३ डिसेंबर २०२४ परतीचा मान्सून समाधानकारक न झाल्यामुळे...

परभणीत राहुल गांधींचे देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप; नेमकं काय म्हणाले पहा

परभणी / नगर सह्याद्री - सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येवरून राज्यातील राजकारण तापलंय. सूर्यवंशी यांच्या...

पुणतांब्यात धार्मिक स्थळी तोडफोड; ग्रामस्थ आक्रमक

राहता । नगर सहयाद्री:- राहता तालुक्यातील पुणतांबा गावात अज्ञात समाजकंटकांनी एका धार्मिकस्थळी तोडफोड केल्याची घटना...

Weather Update: हवामान बिघडलं! हिवाळ्यात पावसाळा; हवामान विभागाकडून अलर्ट

Weather Update: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. थंडीचा कडाका वाढत असतानाच राज्यात पाऊस बरसणार असल्याची...