spot_img
अहमदनगरडॉक्टर तुम्ही सुद्धा! नगरच्या आयुर्वेदामृत उपचार केंद्रात 'धक्कादायक' प्रकार, महिलेसोबत नेमकं घडलं...

डॉक्टर तुम्ही सुद्धा! नगरच्या आयुर्वेदामृत उपचार केंद्रात ‘धक्कादायक’ प्रकार, महिलेसोबत नेमकं घडलं काय?

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री
पाठीचा त्रास होत असल्याने निसर्ग उपचार केंद्रात उपचार घेण्यासाठी गेलेल्या महिलेसोबत तेथील डॉक्टरने गैरवर्तन केल्याची घटना जुने कोर्ट, समर्थ शाळेजवळ, सांगळे गल्लीतील आयुर्वेदामृत निसर्ग उपचार केंद्रात सोमवारी (दि. 18) दुपारी दीडच्या सुमारास घडली.

पीडित महिलेने याप्रकरणी दिलेल्या फिर्यादीवरून डॉक्टर विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष साळवे (पूर्ण नाव माहिती नाही, रा. जुने कोर्ट, समर्थ शाळेजवळ, सांगळे गल्ली) असे गुन्हा दाखल झालेल्या डॉक्टरचे नाव आहे.

फिर्यादी महिलेला पाठीचा त्रास होत असल्याने त्या उपचार घेण्यासाठी सोमवारी दुपारी सांगळे गल्लीतील साळवे याच्या आयुर्वेदामृत निसर्ग उपचार केंद्रात गेल्या होत्या. तेथे साळवे याने त्यांना तुम्हाला चेक करावे लागेल असे म्हणून एका रूममध्ये झोपण्यास सांगितले. तेथे त्याने फिर्यादी महिलेसोबत गैरवर्तन केले. घडलेला प्रकार कोणाला सांगितला तर तुझा बेत पाहतो असे म्हणून धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पारनेर राजकीय कुस्त्या लावण्यासाठी माहीर ; डॉ. सुजय विखे पाटील नेमकं काय म्हणाले पहा…

  बाबासाहेब तांबे सोशल फाउंडेशनच्या आखाड्याचा जिल्ह्यात नावलौकिक पारनेर | नगर सह्याद्री अंबिका माता यात्रा उत्सवा निमित्ताने...

रंजित कासले प्रकरणात मोठं ट्विस्ट; ‘त्या’ 10 लाख रुपयांबाबत धक्कादायक खुलासा, अडचणीत वाढ

बीड / नगर सह्याद्री मोठी बातमी समोर येत आहे, निलंबित पोलीस अधिकारी रंजित कासले...

पावसाचा पहिला अंदाज आला! राज्यात ‘या’ तारखेला कोसळणार?

Weather Update: -भारतीय हवामान विभागाने २०२५ च्या मान्सून २०२५ च्या हंगामासाठीचा आपला अंदाज जाहीर...

‘राष्ट्रवादीचे सभासद नोंदणीतून बळ वाढणार’; टाकळी ढोकेश्वर गटातून अभियानाला सुरुवात

पारनेर | नगर सह्याद्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सभासद नोंदणी अभियानाला पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर जिल्हा...