spot_img
अहमदनगरकार्यकर्त्यांनो सावधान! पोलिसांचा सोशल मीडियावर ‘वॉच’; 'ते' काम कराल तर पडेल महागात

कार्यकर्त्यांनो सावधान! पोलिसांचा सोशल मीडियावर ‘वॉच’; ‘ते’ काम कराल तर पडेल महागात

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री-
लोकसभा निवडणुकीला सुरूवात झाली आहे. राजकीय पक्षाकडून प्रचार सुरू झाला असून काही उत्साही कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाण्याची शयता आहे. यापार्श्वभूमीवर सायबर पोलिसांकडून खबरदारी घेण्यात येत आहे. सायबर पोलिसांचा सोशल मीडियावर वॉच’ असणार आहे. कोणी तेढ निर्माण होणार्‍या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा सायबर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस अधिकारी पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी दिला आहे.

लोकसभेच्या नगर दक्षिण व शिर्डी मतदार संघासाठी एकाच दिवशी, १३ मे रोजी मतदान पार पडणार आहे. राजकीय पक्षाने मतदारांच्या गाठीभेटी घेत प्रचार सुरू केला असून सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचार करण्यावरही जोर दिला आहे. प्रत्येकाच्या हातात स्मार्ट फोन असल्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहचण्याचा मानस सर्वच राजकीय पक्षांचा आहे. विविध राजकीय पक्षातील काही उत्साही कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियाव्दारे बदनामी करणे, अफवा पसरविणे, व्देषपुर्ण पोस्ट टाकणे, खोटे संदेश पाठविण्याची शयता अधिक आहे.

तसेच सोशल मीडियाव्दारे फेक न्युज प्रसारित करणे कायद्याने गुन्हा असुन अशा प्रकारचे संदेश व अफवा पसरवुन दोन समाजातील गटात तेढ निर्माण होवुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी सायबर पोलिसांचा सोशल मीडियावर वॉच’ राहणार असुन अफवा पसरविणारे विरूध्द कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा निरीक्षक आहेर यांनी दिला आहे.

सोशल मीडियाव्दारे बदनामी करणे, अफवा पसरविणे, व्देषपुर्ण पोस्ट टाकणार्‍यांविरोधात तक्रार देण्याकरिता जिल्हा पोलीस दलाकडुन ९१५६४३८०८८ हा मोबाईल क्रमांक देण्यात आला आहे. या मोबाईल क्रमांकावर व्हॉट्सअ‍ॅपची सुविधा सुध्दा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागरिकांनी त्या मोबाईल क्रमांकावर तक्रार करावी, असे आवाहन निरीक्षक आहेर यांनी नागरिकांना केले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पे अँड पार्कवरुन वादावादी!; किरण काळे म्हणाले, मागे घ्या, अन्यथा..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- शुक्रवारी सकाळची वेळ. सकाळीच नागरिकांमध्ये आणि मनपाचे कर्मचारी असल्याचे म्हणत पे...

आमदार जगताप यांचा शहरात सत्कार; म्हणाले, हिरवी वळवळ थांबवायची असेल तर..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री लोकसभेच्या निवडणुकीत जातीत माणसे विभागली गेली होती. निवडणुकीच्या निकालानंतर सर्वत्र हिरवा...

१०४ ग्रॅम सोन्यावर डल्ला; प्रोफेसर चौकातील प्रकार

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- सोन्याचे दागिने तयार व दुरूस्ती करण्यासाठी दिलेले आठ लाख 30 हजाराचे...

भीषण स्फोटाने भंडारा हादरलं! ‘इतक्या’ जणांचा मृत्यू

स्फोटकं बनवणाऱ्या कंपनीमध्ये स्फोट भंडारा | नगर सह्याद्री:- भंडाऱ्यामध्ये स्फोटकं बनवणाऱ्या कंपनीमध्ये मोठा स्फोट झाल्याची...