spot_img
ब्रेकिंगVoting: ओळखपत्र नाही तरी करा मतदान? 'हे' पुरावे धरले जातात ग्राह्य, पहा...

Voting: ओळखपत्र नाही तरी करा मतदान? ‘हे’ पुरावे धरले जातात ग्राह्य, पहा यादी..

spot_img

नगर सहयाद्री वेब टीम-
मतदान करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने मतदार छायाचित्र ओळख जवळ नसल्यास अन्य 12 पुरावे ओळखीचे पुरावे म्हणून ग्राह्य धरले आहेत. त्यापैकी कोणताही एक पुरावा दाखविल्यानंतर संबंधितांना मतदान करता येईल,अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिली आहे. लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी १३ मे रोजी मतदान होणार आहे त्या पार्श्वभूमीवर ही माहिती दिली आहे.

मतदारांना छायाचित्र असलेलं ओळखपत्र अनिवार्य आहे. मतदान केंद्रावर ओळख पटविण्यासाठी ते सादर करावं लागणार आहे. जे मतदार असं ओळखपत्र सादर करू शकनार नाहीत, त्यांना निवडणूक निवडणूक आयोगाने सांगितलेल्या १२ पैकी कोणताही एक पुरावा सादर करावा लागणार आहे. तो ग्राह्य धरण्यात येणार आहे.

हे बारा पुरावे कोणते आहेत?
वाहन चालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स), पारपत्र (पासपोर्ट), केंद्र अथवा राज्य शासन, तसेच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, पब्लिक लिमिटेड कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वितरित केलेले छायाचित्र ओळखपत्र, बँक किंवा टपाल विभागातर्फे छायाचित्रासह वितरित करण्यात आलेले पासबुक, पॅन कार्ड, राष्ट्रीय लोकसंख्या (Identity Proofs For Voting) नोंदवही अंतर्गत भारतीय महानिबंधक आणि जनगणना आयुक्तांनी जारी केलेले स्मार्ट कार्ड, मनरेगा अंतर्गत निर्गमित करण्यात आलेले रोजगार ओळखपत्र, निवृत्तीवेतनाची दस्तावेज, संसद, विधानसभा, विधानपरिषदेच्या सदस्यांना वितरित केलेले अधिकृत ओळखपत्र, आधार कार्ड, भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सशक्तिकरण मंत्रालयाच्यावतीने दिव्यांग व्यक्तींना वितरित केलेले विशेष ओळखपत्र, कामगार मंत्रालयाद्वारा वितरित आरोग्य विमा स्मार्ट कार्ड हे १२ पुरावे मतदानासाठी ग्राह्य धरले जाणार आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

बिबट्याच्या हल्ल्यात पारनेर तालुक्यात 40 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

  कळस परिसरात ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण; वनविभागाकडे तातडीने कारवाईची मागणी गणेश जगदाळे / नगर सह्याद्री : पारनेर...

सरकार झुकलं! मागण्या मान्य पण जरांगे पाटलांनी पुन्हा सरकारला दिला ‘हा’ इशारा

मुंबई / नगर सह्याद्री - मनोज जरांगे यांच्या मागण्याचा सरकारकडून जीआर काढण्यात आला आहे....

पानटपरीवर गॅंगवार; कोयत्याने सपासप वार! शहरात गुन्हेगारांचा कहर, चाललंय काय?, वाचा सविस्तर..

Ahilyanagar Crime News: पानटपरीवर बसलेल्या युवकावर दहा जणांच्या टोळक्याने प्राणघातक हल्ला केला. मित्राचे भांडण...

सबसे हटके गौतमी पाटील झटके! ‘टीप टीप बरसा पाणी’ वर स्विमिंग पूलमध्ये डान्स, पहा व्हायरल व्हिडीओ..

मुंबई | नगर सहयाद्री लोकप्रिय लावणी कलाकार आणि सोशल मीडिया स्टार गौतमी पाटील पुन्हा...