spot_img
अहमदनगरMaharashtra Politics : 'तुम्ही' फेक न्यूजची फॅक्टरी चालवता का?; आमदार थोरातांचा महायुतीवर...

Maharashtra Politics : ‘तुम्ही’ फेक न्यूजची फॅक्टरी चालवता का?; आमदार थोरातांचा महायुतीवर हल्लाबोल, वाचा सविस्तर..

spot_img

Maharashtra Politics : माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी महायुती सरकारवर फेक न्यूजवरून हल्लाबोल केला आहे. तुम्ही फेक न्यूजची फॅक्टरी चालवता का? असा सवाल करत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. सातत्याने खोट्या बातम्या पसरवून फेक नॅरेटिव्ह तयार करणं. एवढं एकच काम मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पूर्ण वेळ करत असल्याची टीका देखील माजी महसूल मंत्री थोरात यांनी केली आहे.

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी त्यांच्या × सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. त्यामध्ये त्यांनी म्हंटल आहे की, राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री फेक न्यूजची फॅक्टरी चालवत आहेत का ? सातत्याने खोट्या बातम्या पसरवून फेक नॅरेटिव्ह तयार करणे एवढेच एकच काम मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पूर्ण वेळ करत आहेत.

https://x.com/bb_thorat/status/1835185136620466583?

अगोदर राहुल गांधींनी आरक्षणाबाबत जे वक्तव्य केलेच नाही त्याबद्दल फेक न्यूज पसरवून आंदोलनाची नौटंकी केली आणि आता कर्नाटकात जे घडलेच नाही त्याबाबत फेक न्यूज पसरवून राज्यात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. राज्यातील जनता सुज्ञ असून तुमच्या फेक नॅरेटीव्ह सोबत तुमचेही सरकारही उखडून फेकल्याशिवाय राहणार नाही. असा इशारा माजी महसूल मंत्री थोरात यांनी दिला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘वारकरी’ शब्द कसा झाला तयार?, वाचा पंढरीच्या वारीचा इतिहास

नगर सहयाद्री टीम: "विठू नामाचा गजर, टाळ-मृदुंगांचा निनाद आणि माउली-माउलीचा जयघोष" याने आसमंत भारून...

आनंदवार्ता, दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रिय होणार; ‘या’ जिल्ह्यात धो धो बरसणार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांत पुढील चार दिवस दमदार पाऊस होणार असल्याचा...

महिला भजनात दंग, भामट्यांनी दाखवले रंग!, १०० ग्रॅम सोने लंपास..

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री   बंद घराच्या खिडकीची जाळी तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे आठ तोळ्याचे सोन्याचे...

‘कुख्यात गुन्हेगार बंटी राऊत स्थानबद्ध’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील माणीक चौक, लाटे गल्ली येथील उख्यात गुन्हेगार बंटी उर्फ भावेश...