spot_img
अहमदनगर'माजी सभापती भानुदास कोतकर यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्याचे वाटप'

‘माजी सभापती भानुदास कोतकर यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्याचे वाटप’

spot_img

अहमदनगर| नगर सह्याद्री
कृषी उत्पन्न बाजार समिती, पंचायत समितीचे माजी सभापती भानुदास कोतकर यांच्या वाढदिवसानिमित्त भानुदास कोतकर फाउंडेशनच्या वतीने केडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व मनपा शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

यावेळी बाजार समितीचे संचालक नीलेश सातपुते, माजी सभापती मनोज कोतकर, जालिंदर कोतकर, सुनील कोतकर, भूषण गुंड, अशोक कराळे, शिवा मोढवे, पोपट कराळे, गणेश कराळे, शेळके, राहुल कांबळे, वैभव गिरी, संजय गुंड, महेश कार्ले, आसीफ सय्यद, महेश झरेकर, ईश्वर नवसुपे आदी उपस्थित होते.

कृषी उत्पन्न बाजार समिती, पंचायत समितीचे माजी सभापती भानुदास कोतकर यांचा वाढदिवस केडगावमध्ये विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. सामाजिक भावनेतून कार्यरत असलेल्या भानुदास कोतकर फाउंडेशनने वाढदिवसाचे औचित्य साधून जिल्हा परिषदेच्या ११ शाळांमधील सुमारे १५०० शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वितरित केले.

यावेळी नीलेश सातपुते म्हणाले की, केडगावच्या विकासाची मुहूर्तमेढ भानुदास कोतकर यांनी रोवली. नेप्ती उपबाजार समितीच्या माध्यमातून नगरची ओळख राज्यभर झाली. बेरोजगारांना रोजगाराची संधी त्यांच्या माध्यमातून मिळाली. त्यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत भानुदास कोतकर फाऊंडेशनच्या वतीने केडगावमधील जि.प.शाळांमधील विद्यार्थ्यांची गरज ओळखून त्यांना शालेय साहित्य दिल्याचे ते म्हणाले.

मनोज कोतकर म्हणाले की, भानुदास कोतकर यांच्या मार्गदर्शनाखाली माजी महापौर संदीप कोतकर यांनी शहराचा व केडगावचा विकास केला. त्यांच्या काळातील कामे सर्वांना ज्ञात आहेत. सामाजिक, शैक्षणिक आदी क्षेत्रांत केडगावने आपले वेगळेपण कायम जपले आहे, असे ते म्हणाले. यावेळी जालिंदर कोतकर, शेळके, राहुल कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले.

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सरपंच देशमुख यांच्या मारेकऱ्यांना सोडू नका; मंत्री धनंजय मुंडे नेमकं काय म्हणाले?

Politics News: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाने राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. यामध्ये धनजंय...

साई बाबांच्या शिर्डीत भक्तांची फसवणूक; गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं?

शिर्डी । नगर सहयाद्री:- भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या साई बाबांच्या शिर्डीत भक्तांची फसवणूक होत असल्याचा...

‘पारनेरला शनिवारी राष्ट्रवादीचा मेळावा’; कोण राहणार उपस्थित?

तालुकाध्यक्ष विक्रम कळमकर यांची माहिती पारनेर । नगर सहयाद्री:- पारनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या...

‘कष्टाचे दाम मिळविण्यासाठी बळीराजाचा संघर्ष’

श्रीगोंदा । नगर सहयाद्री:- श्रीगोंदा तालुक्यातील बाजारात भाज्यांचे दर कमी झाल्याने सर्वसामान्य समाधान व्यक्त करत...