सहकार चळवळीच्या माध्यमातून जी. एस. महानगर बँकेचे संस्थापक अध्यक्ष सॉलिसिटर गुलाबराव शेळके, ॲड उदय शेळके यांचे काम लोकाभिमुख
माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री आनंदराव अडसूळ | उदय गुलाबराव शेळके फौंडेशनच्या वतीने जलसेन पुरस्कारांचे वितरण
पारनेर । नगर सहयाद्री:-
सहकार चळवळीच्या माध्यमातून जी. एस. महानगर बँकेचे संस्थापक अध्यक्ष सॉलिसिटर गुलाबराव शेळके व माजी अध्यक्ष ॲड उदय शेळके यांचे काम लोकाभिमुख असून मुंबई स्थायिक अहिल्यानगर व पुणे जिल्ह्यातील जनतेसाठी शेळके कुटुंबाचे सर्वाधिक योगदान असल्याचे प्रतिपादन माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री आनंदराव अडसूळ यांनी व्यक्त केले आहे.
उदय गुलाबराव शेळके फौंडेशनच्या वतीने जलसेन पुरस्कार 2025 चे वितरण माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री आनंदराव आडसूळ, खासदार नीलेश लंके, रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अरुण कडू पाटील, माजी आमदार सुधीर तांबे, माजी आमदार अशोकराव धात्रक, माजी आमदार अशोकराव पवार, जी. एस. महानगर बँकेच्या अध्यक्षा सुमनताई शेळके, उपाध्यक्ष भास्करराव कवाद, माजी संचालक सि. बा आडसुळ, लक्ष्मण गाजरे, फौंडेशनच्या अध्यक्षा व जिल्हा सहकारी बँक व जी. एस. महानगर बँकेच्या संचालिका गीतांजली शेळके यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार नीलेश लंके होते.
यावेळी फौंडेशनच्या अध्यक्षा गीतांजली शेळके यांनी प्रास्ताविक भाषनात फौंडेशनच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या सामाजिक व शैक्षणिक उपक्रमाची माहिती दिली. यावेळी जी. एस. महानगर बँकेचे माजी संचालक सि.बा.आडसुळ, लक्ष्मण गाजरे, मुंबई महानगरपालिकेचे सभागृह नेते रविंद्र इथापे, जी. एस. महानगर बँकेच्या संचालिका स्मिता पाटील आदिंचे भाषणे झाली. यावेळी उदय गुलाबराव शेळके शैक्षणिक पुरस्कार देखील देण्यात आले. त्याच बरोबर उदय गुलाबराव शेळके जलसेन पुरस्कार 11 हजार रुपये रक्कम आणि पुरस्कार चिन्ह देऊन तालुक्यातील गावांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्तम घोलप यांनी केले. शेवटी बाजार समितीचे संचालक डॉ. आबासाहेब खोडदे व सुभाष खणकर यांनी आभार मानले.
जलसेन पुरस्काराने तालुक्याचा नावलौकिक राज्यात झाला: खा. लंके
सॉलिसिटर गुलाबराव शेळके साहेब व ॲड. उदयदादा शेळके यांनी बँकेच्या माध्यमातून राज्यातील जनतेला मोठ्या प्रमाणात आर्थिक पाठबळ दिले आहे. शेळके कुटुंबाने सामाजिक, शैक्षणिक, सहकार चळवळीत काम करताना पिंपरी जलसेन येथे पाणी फौंडेशनच्या माध्यमातून गाव व परिसर सुजलाम सुफलाम करण्यासाठी प्रयत्न केले असून राज्यस्तरीय पुरस्काराने तालुक्याचा नावलौकिक राज्यात झाला आहे. यासाठी फौंडेशनच्या अध्यक्षा गीतांजलीताई शेळके यांनी व गावकऱ्यांनी मोठे परिश्रम घेतले असल्याचे खासदार नीलेश लंके यांनी सांगितले.
पाणी फौंडेशनच्या माध्यमातून राज्यात आदर्शवत काम: मा. आ. सुधीर तांबे
थोरात कुटुंबाचा राजकीय व सामाजिक वारसा घेऊन गीतांजली शेळके यांनी शेळके कुटुंबात कार्यरत राहून सामाजिक, शैक्षणिक उपक्रम सुरू ठेवीत पाणी फौंडेशनच्या माध्यमातून राज्यात आदर्शवत काम केले आहे. आजोबा भाऊसाहेब थोरात यांचा सामाजिक वारसा जोपासण्यासाठी परिश्रम घेत सॉलिसिटर गुलाबराव शेळके व ॲड.उदय शेळके यांचे कार्य पुढे नेण्यासाठी सर्वांना बरोबर घेऊन काम करीत आहेत ही तालुक्यातील जनतेच्या दृष्टीने भुषनास्पद बाब आहे, असे मत माजी आमदार सुधीर तांबे यांनी व्यक्त केले.
शेळके यांचा सहकार चळवळीत राज्याला आदर्श: अशोकराव धात्रक
जी. एस. महानगर बँकेचा गौरवशाली इतिहास सर्वांना ज्ञात आहे. सॉ. गुलाबराव शेळके व उदय शेळके यांनी सहकार चळवळीत काम करताना राज्याला आदर्श घालून दिला आहे. शैक्षणिक क्षेत्रात काम करताना संजीवनी प्रतिष्ठान संस्थेच्या माध्यमातून ॲड. उदय शेळके यांनी व्यवसायीक शिक्षण देत पुणे व अहिल्यानगर जिल्ह्यातील शेकडो कुटुंबाना स्थिरस्थावर केले असल्याचे माजी आमदार अशोकराव धात्रक यांनी सांगितले.
पुरस्कारांच्या माध्यमातून गावांना प्रोत्साहन:अशोक पवार
सॉलिसीटर गुलाबराव शेळके व उदय शेळके यांनी राज्यातील औद्योगिक विकासासाठी जी. एस. महानगर बँकेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात योगदान दिले आहे. पाणी फौंडेशनच्या माध्यमातून गीतांजली शेळके यांनी सर्वसामान्य शेतकरी व जनतेच्या हितासाठी मोठे काम केले असून तालुक्यातील गावांना उदयदादा गुलाबराव शेळके जलसेन पुरस्कार देऊन प्रत्येक गावाने जलसंधारणाचे काम करावे यासाठी पुरस्कार माध्यमातून प्रोत्साहन दिले आहे असल्याचे मत माजी आमदार अशोकराव पवार यांनी व्यक्त केले.