अहमदनगर । नगर सहयाद्री
नांदगाव शिवारात फुटलेली मुख्य जलवाहिनी दुरुस्त केल्यानंतर पुन्हा त्याच ठिकाणी फुटली आहे. त्यामुळे शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगर भागास दोन दिवस उशिराने व कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असल्याचे महापालिकेकडून कळवण्यात आले आहे.
सोमवारी मुख्य जलवाहिनी नांदगाव शिवारात पाण्याच्या व हवेच्या दाबाने फुटली होती. या जलवाहिनी दुरूस्तीचे काम पूर्ण करून पाणी उपसा व पाणीपुरवठा पूर्ववत करण्याचे नियोजन सुरू होते. मात्र,मंगळवारी पुन्हा त्याच ठिकाणी जलवाहिनी तडा जाउन फुटली. त्याच्या दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आलेले आहे.
सिध्दार्थनगर, लालटाकी, तोफखाना, दिल्लीगेट, नालेगाव, चितळे रोड, आनंदी बाजार, कापड बाजार, ख्रिस्त गल्ली, पंचपीर चावडी, जुने मनपा कार्यालय परिसर, माळीवाडा, बालिकाश्रम रोड परिसर, सावेडी, ढवणवस्ती, सारस नगर, बुरूडगाव रोड या भागात गुरूवारी (११ जुलै) पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.
तर, मंगलगेट, रामचंद्रखुंट, झेंडीगेट, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, दाळमंडई, काळू बागवान गल्ली, धरती चौक, बंगाल चौकी, माळीवाडा, कोठी या भागात व गुलमोहर रोड, प्रोफेसर कॉलनी परिसर, सिव्हील हाडको, प्रेमदान हाडको, टीव्ही सेंटर परिसर, म्युनिसीपल हाडको भागात शुक्रवारी (१२ जुलै) पाणी सोडण्यात येणार आहे
दरम्यान, वसंत टेकडी येथून पाणी पुरवठा होणा-या मुकुंदनगर, सुर्यनगर, लक्ष्मी नगर, अर्बन बँक कॉलनी, केडगाव इंडस्ट्रीयल, अमित नगर, गायके मळा, पंचशिल वाडी या उपनगर भागास एक दिवस विलंबाने पाणी पुरवठा होणार असल्याची माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिली आहे.