spot_img
देशPolitics News: राजकीय वर्तुळात चर्चा!! बडा नेता भाजपशी युती करणार? कारण काय,...

Politics News: राजकीय वर्तुळात चर्चा!! बडा नेता भाजपशी युती करणार? कारण काय, पहा..

spot_img

Politics News:बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार वर्षभराच्या आत पुन्हा एकदा भाजपशी युती करण्याच्या तयारीत असून राजदशी काडीमोड घेऊन नितीश कुमार यांचा जदयू भाजपसोबत सरकार स्थापन करण्याची शक्यता सध्याच्या राजकीय घडामोडी पाहता वाढली आहे.

नव्या सरकारमध्ये नितीश कुमार यांच्याकडेच मुख्यमंत्रीपदाची धुरा असेल, असेही बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर नितीश कुमार यांनी बिहारमधील तब्बल २२ आयएएस अधिकारी व ४५ इतर वरिष्ठ अधिकार्‍यांच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत.बिहार सरकारने अवघ्या चार दिवसांपूर्वी, अर्थात २३ जानेवारीला २९ आयएएस अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या होत्या. आता त्यात शुक्रवारी बदली केलेल्या २२ आयएएस अधिकार्‍यांची भर पडली आहे. हे सर्व अधिकारी जिल्हा न्यायदंडाधिकारी स्तरावरचे प्रशासक होते.

त्याव्यतिरिक्त बिहार प्रशासकीय सेवेतील ४५ इतर वरिष्ठ अधिकार्‍यांच्याही बदल्या केल्या आहेत. यातील सर्वात चर्चेत असणारी बदली म्हणजे पाटण्याचे जिल्हाधिकारी चंद्रशेखर सिंह यांना थेट मुख्यमंत्री सचिवालयात विशेष सचिव पदावर आणले आहे. गेल्या काही दिवसांपासून चंद्रशेखर सिंह यांचे बिहार शिक्षण विभागाशी रंगलेले लेटरवॉर चर्चेत होते. वाढत्या थंडीच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद ठेवण्याच्या निर्णयावरून चंद्रशेखर सिंह यांचे बिहारच्या शिक्षण विभागाशी वाद झाल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, गेल्या चार दिवसांत बिहार सरकारने तब्बल ५१ आयएएस अधिकार्‍यांची बदली केली आहे.

नितीश कुमार सातत्याने बाजू बदलण्यासाठी कुप्रसिद्ध होऊ लागले आहेत. अगदी अलिकडे २०२० साली झालेल्या निवडणुकांमध्ये नितीश कुमार यांनी भाजपसोबत निवडणूक लढविली; पण जदयू तिसर्‍या स्थानी फेकला गेला. तरीही भाजपसोबत स्थापन सरकारमध्ये नितीश कुमार मुख्यमंत्री झाले. २०२२ मध्ये त्यांनी भाजपकडे पाठ फिरवून पुन्हा लालूप्रसाद यादव यांच्या राजदशी आघाडी केली. पुन्हा नितीश कुमार मुख्यमंत्री झाले; पण दोन वर्षांच्या आत पुन्हा एकदा नितीश कुमार बाजू बदलण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आजचे राशी भविष्य! ‘या’ राशींसाठी आनंदी दिवस..

मुंबई । नगर सह्याद्री - मेष राशी भविष्य आज तुम्हाला आश्चर्याचा सुखद धक्का देणार आहे....

मोठी बातमी : तनपुरे, वर्पे यांच्या पाठोपाठ लंके यांचा ईव्हिएम पडताळणीसाठी अर्ज, केली ‘ही’ मागणी

१८ बुथवरील मतांची पडताळणी करण्याची मागणी ८ लाख ४९ हजार ६०० रूपये शुल्क जमा पारनेर /...

बच्चू कडू यांच्याबद्दल विखे पाटीलांचे मोठे विधान

राहाता / नगर सह्याद्री - Radhakrishn Vikhe Patil | Bachchu Kadu : महाराष्ट्रात महायुतीच्या...

महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार? दिग्गज नेत्यांच्या वक्तव्यानं चर्चेला उधाण

मुंबई / नगर सह्याद्री - विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या त्सुनामीपुढे महाविकास आघाडीला पराभवाचा मोठा झटका बसला....