spot_img
अहमदनगरनोकरीच्या ठिकाणी निघाला पण पोहचलाच नाही? वाटेतच घडले असे काही सर्व परीसरच...

नोकरीच्या ठिकाणी निघाला पण पोहचलाच नाही? वाटेतच घडले असे काही सर्व परीसरच हळहळला..

spot_img

जामखेड । नगर सहयाद्री:-
जामखेडहून पुणे येथे आपल्या नोकरीच्या ठिकाणी जात असताना नगर- सोलापूर रस्त्यावर ट्रॅव्हल्स व ट्रकच्या अपघातात तरुणाचा मृत्यू झाला आहे. सदरचा अपघात नगर-सोलापूर रोडवरील माहीजळगाव रोडवर घडला आहे. दिपक विलास पवार (वय ३९, हल्ली रा. खडकी, पुणे)असे मयत तरुणाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की जामखेड येथील दिपक विलास पवार वय ३९, (हल्ली रहाणार खडकी, पुणे) हा पुणे येथील येथे आपल्या कुटुंबासमवेत नोकरी निमित्त पुण्यात रहात होता. तो पुणे येथील खडकी परीसरातील सेंट्रल गव्हर्न्मेंट च्या दारुगोळा बनवणाऱ्या विभागात नोकरीस होता. जामखेड येथे दिपक च्या घराचे बांधकाम सुरू असल्याने तो गावी आला होता. काल रविवारी सुट्टी संपल्यानंतर नोकरीच्या ठिकाणी हजर रहाण्यासाठी तो रात्री उशिरा जामखेड येथुन खाजगी ट्रॅव्हल गाडीने पुणे येथे चालला होता.

गाडीत जागा नसल्याने तो पुढे ड्रायव्हरच्या बाजुच्या कॅबिनमध्ये बसला होता. सदरची ट्रॅव्हल्स नगर जामखेड रस्ता खराब आसल्याने माहीजळगाव मार्गे पुणे येथे चालली होती. यावेळी रात्री एक ते दीड वाजण्याच्या सुमारास या ट्रॅव्हल्सची समोर चाललेल्या ट्रकला किन्नर साईडच्या बाजुने जोराची धडक बसली.

या अपघातात कॅबिन मध्ये बसलेला दिपक पवार हा गंभीर जखमी झाल्याने नगर येथे हलवण्यात आले होते मात्र पुर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. दिपक पवार याच्यावर जामखेड येथे दुपारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या मागे एक लहान मुलगा ,पत्नी व आई वडील असा परीवार आहे. दिपक याच्या आपघातती मृत्यू मुळे परीसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

प्रतीक्षा संपली! महाराष्ट्र मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर, कोणाला कोणते खाते मिळाले, पहा संपूर्ण यादी

मुंबई / नगर सह्याद्री - Maharashtra Portfolio Allocation : मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर खाते वाटप...

लाडक्या बहिणींना १५०० मिळणार की २१००? मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टच सांगितले…

मुंबई / नगर सह्याद्री - Ladki Bahin Yojana 6th Installment: लाडकी बहीण योजनेचा पुढील...

अहिल्यानगरमध्ये खळबळजनक प्रकार?; एटीएममध्ये ‘हेराफेरी’

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री :- केडगाव येथील एका नामांकित बँकेच्या एटीएमला पटटी चिटकवत 40 हजार रुपयांची...

कांदा कोसळला; शेतकरी आक्रमक

सोलापूर-नाशिकमध्ये लिलाव बंद | मनमाड-येवला महामार्गावर रास्तारोको नाशिक | नगर सह्याद्री गेल्या 10 दिवसांत कांद्याचे क्विंटल...