spot_img
अहमदनगरAhmednagar News: वाद मिटविण्यासाठी गेले पण भलतेच झाले? नेमकं घडलं काय..

Ahmednagar News: वाद मिटविण्यासाठी गेले पण भलतेच झाले? नेमकं घडलं काय..

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री
पती- पत्नीचा वाद मिटविण्यासाठी गेलेल्यांना मारहाण केल्याची घटना मंगळवारी (दि. २३) दुपारी नगर तालुयातील पिंपळगाव माळवी येथे घडली. याप्रकरणी पुजा प्रशांत पवार (वय २७ रा. पिंपळगाव माळवी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्यांच्या पतीसह सात जणांविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नामदेव लक्ष्मण चांदणे, नीलेश नामदेव चांदणे, राजु बबन पवार, किशोर बबन पवार, प्रशांत बबन पवार, आशाबाई बबन पवार, आश्विनी राजु पवार (सर्व रा. पिंपळगाव माळवी) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी पुजा व त्यांचे पती प्रशांत यांच्यात वाद असून गेल्या एक महिन्यापासून पुजा त्यांच्या माहेरी राहत आहे.

मंगळवारी त्यांना वाद मिटविण्यासाठी फोन आल्याने त्या त्यांच्या भावांना घेऊन पिंपळगाव माळवी येथे गेल्या होत्या. तेथे असलेला नीलेश चांदणे हा आत बसून चर्चा करू असे म्हणत होता तर पुजाचा भाऊ सुनील त्यांना बाहेर बसूनच चर्चा करू म्हणत होते. यातून त्यांचात वाद झाले नीलेश व इतरांनी पुजा, त्यांचे भाऊ सुनील व दीपक यांना शिवीगाळ करून मारहाण केली.

जिवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सदरची घटना घडल्यानंतर पुजा व त्यांचे भाऊ एमआयडीसी पोलीस ठाण्यात आले व त्यांनी फिर्याद दिली आहे. पोलीस अंमलदार रजपुत अधिक तपास करत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

धक्कादायक: व्यापार्‍यांच्या जमीनीवर ताबेमारी, कुठे घडली घटना…

व्यापार्‍यांनी आमदार जगताप यांच्या नेतृत्वाखाली घेतली एसपींची भेट अहिल्यानगर | नगर सह्याद्री नगर तालुक्यात शहरातील व्यापार्‍यांच्या...

मार्केटींगसाठी ठेवलेल्या मुलीवर अत्याचार; पती-पत्नी आरोपी, कुठे घडला प्रकार पहा

अहिल्यानगर | नगर सह्याद्री मार्केटींगचे काम करण्यासाठी ठेवलेल्या अल्पवयीन मुलीसोबत (वय १७) वारंवार शरीर संबंध...

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा मान नगरला; आमदार संग्राम जगताप म्हणाले…

नियोजनाची बैठक | महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांचा सत्कार अहिल्यानगर |...

धुक्यात नगर हरवले; नगर-सोलापूर रोडवर अपघात; मोठा अनर्थ टळला

  अहिल्यानगर | नगर सह्याद्री डिसेंबर महिन्यातील कडाक्याच्या थंडीचा अंमल संपून काही दिवस ढगाळ वातावरणाने नगर...