spot_img
अहमदनगरदेवगड अश्वस्पर्धेचा राज्यभर लौकिक: आमदार थोरात

देवगड अश्वस्पर्धेचा राज्यभर लौकिक: आमदार थोरात

spot_img

अश्व प्रदर्शनात देशभरातून मोठा सहभाग
संगमनेर। नगर सह्याद्री
घोडा हा माणसाचा आवडता प्राणी असून इतिहास कालीन लढायांमध्ये घोड्यांचे मोठे योगदान राहिले आहे. देखणी जनावर व रुबाबदार घोडी बाळगणे हा नाद असावा लागतो. देवगड येथे होत असलेल्या या अश्व बाजार व प्रदर्शनात देशभरातून मोठ्या संख्येने अश्व दाखल झाले असून या स्पर्धेचा राज्यभरात मोठा लौकिक निर्माण झाले असल्याचे गौरवोद्गार काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी काढले आहे.

हिवरगाव पावसा, देवगड येथे तालुका अश्वप्रेमी असोसिएशन व शिवराज निर्माण संघटनेच्या वतीने आयोजित भव्य अश्वस्पर्धा अश्वप्रदर्शन व अश्वबाजार उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मा. आ. डॉ सुधीर तांबे, विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर, आयोजक रणजीतसिंह देशमुख, सौ दुर्गाताई तांबे, कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात,राजेंद्र चकोर, इंद्रजीत भाऊ थोरात, उत्कर्षाताई रुपवते ,देवस्थानचे अध्यक्ष उत्तम नाना जाधव, सुभाष गडाख, डॉ. प्रमोद पावसे ,डॉ. संदीप पावसे, रफिक फीटर,मकरंद मुळे यांसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना आमदार थोरात म्हणाले की, देवगड हे संगमनेर तालुक्यातील भाविकांचे मोठे श्रद्धास्थान आहे. ही यात्रा म्हणजे प्रत्येकाच्या आवडीचा विषय आहे. लहानपणी या यात्रेला आम्ही बैलगाडीतून यायचो. दूध संघाच्या माध्यमातून देवगड परिसरात वृक्षारोपणासह अनेक विकास कामे झाली आहेत. मागील सात वर्षांपासून होत असलेले प्रदर्शन हे राज्य पातळीवर पोहोचले आहे. देशभरातून अनेक अश्वमालक या ठिकाणी येत असतात.

देखणी जनावरे, घोडेबाळगणे हा नाद असावा लागतो. शेतकऱ्यांना या जनावरांचे मोठे प्रेम असते. घोडे बाळगणे म्हणजे खर्च ज्यादा असतो. ही हौस असते .अगदी इतिहासात व शिवकाळात घोड्यांचे महत्त्व अनन्यसाधारण राहिले आहे. रणजीतसिंह देशमुख यांच्या पुढाकारातून या ठिकाणी विविध जातींचे घोडे येत असून यामुळे अश्वस्पर्धा व अश्व बाजार असा मोठा मेळा या ठिकाणी होतो.

संगमनेर तालुक्यात निळवंडे चे पाणी आले आहे .उजव्या आणि डाव्या कालव्यातून पाणी आल्याने मोठे समाधान आहे. यापुढील काळातही भरपूर पाऊस होऊन निळवंडे दरवर्षी ओरप्लो होऊ दे आणि दोन्हीही कालवे वर्षभर सतत सुरू राहू दे अशी प्रार्थना ही आमदार थोरात यांनी केली असून शेतकऱ्यांनी जास्त उत्पादन केल्यानंतर केंद्र सरकारने कांदा बंदी करून शेतकऱ्यांची पिळवणूक करू नये अशी टीकाही आमदार थोरात यांनी केली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोक प्रेमी असोसिएशनचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांनी केले सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले तर डॉ प्रमोद पवसे यांनी आभार मानले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

शरद पवार शुक्रवारी नगरमध्ये; लंके यांच्या संवाद यात्रेचा समारोप; ‘या’ दिवशी नीलेश लंके अर्ज दाखल करणार!

अहमदनगर | नगर सह्याद्री महाविकास आघाडीचे नगर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार नीलेश लंके यांच्या संवाद यात्रेचा...

आमदार निलेश लंकेंसाठी फाळके-कळमकर यांची केमिस्ट्री!; थोरातांचेही बळ! लंके प्रतिष्ठानची स्वतंत्र यंत्रणा निर्णायक…

मतदारसंघात प्रतिष्ठानचे आतापासूनच स्वतंत्र अस्तित्व | संवाद यात्रा निर्णायक टप्प्यावर! सारीपाट / शिवाजी शिर्के लोकसभा निवडणुकीसाठी...

जिल्हा बँकेचा ‘त्या’ शेतकऱयांना दिलासा! घेतला मोठा निर्णय, ‘ते’ व्याज २२ एप्रिलपर्यंत जमा करणार

माजी मंत्री, चेअरमन शिवाजी कर्डीले यांची माहिती अहमदनगर / नगर सह्याद्री - अहमदनगर जिल्हा...

लोकसभेसाठी अर्ज भरण्याचा महुर्त ठरला! खा. विखे, आ. लंके कधी भरणार अर्ज… पहा

अर्ज भरण्यास २५ एप्रिल पर्यंत मुदत | १३ मेला मतदान अहमदनगर । नगर सहयाद्री- लोकसभेच्या अहमदनगर...