spot_img
ब्रेकिंगउपमुख्यमंत्री फडणवीस विधानपरिषद निवडणूकीत दाखवणार करिश्मा;'ती' जादू पुन्हा चालणार का? वाचा सविस्तर

उपमुख्यमंत्री फडणवीस विधानपरिषद निवडणूकीत दाखवणार करिश्मा;’ती’ जादू पुन्हा चालणार का? वाचा सविस्तर

spot_img

मुंबई । नगर सहयाद्री
विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज शेवटच्या दिवशी कोणीच मागे न घेतल्याने ११ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात आहेत. १२ जुलैला विधान परिषदेसाठी विधीमंडळात मतदान पार पडणार आहे. गुप्त पद्धतीने मतदान असल्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक घोडेबाजार होण्याची शयता आहे.

विधानपरिषद निवडणूकीसाठी महायुतीची महत्वाची जबाबदारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. पहिल्या पसंतीची, दुसर्‍या पसंतीची मत कशी द्यायची यावर देवेंद्र फडणवीसांकडे महायुतीच्या आमदारांना मार्गदर्शन करणार आहेत. आपापला उमेदवार आणण्याऐवजी महायुतीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी मतदानाचा पॅटर्न निश्चित करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

२०२२ च्या राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी मॅजिक केली होती. आता तोच मॅजिक पॅटर्न पुन्हा चालवण्याची मुख्य जबाबदारी देवेंद्र फडणवीसांकडे देण्यात आली आहे. त्यामुळे २०२२ सारखी देवेंद्र फडणवीसांचा जादू चालणार की नाही, हे आगामी काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.
विधानपरिषद निवडणुकीसाठी सत्ताधारी महायुतीने नऊ उमेदवार उभे केले असून विरोधी महाविकास आघाडीचे तीन उमेदवार रिंगणात आहेत.

पाच उमेदवारांसह भाजपने सर्वाधिक उमेदवार उभे केले आहेत. अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने प्रत्येकी दोन उमेदवार उभे केले आहेत. काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाने प्रत्येकी एक उमेदवार उभा केला आहे. शरद पवार गटाने भारतीय शेतकरी आणि कामगार पक्षाचे उमेदवार जयंत पाटील यांना पाठिंबा दिला आहे.

महायुतीमध्ये भाजपचे १०३, शिवसेनेचे ४० आणि राष्ट्रवादीचे ४० आमदार आहेत. महायुतीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (मनसे), १ आमदार, बहुजन विकास आघाडी २ आमदार असलेल्या एनडीएचा भाग आहे. प्रहार जनशक्ती पक्ष १, इतरांसह, महायुतीचा वाटा २०३ वर आहे. महाविकास आघाडीकडे काँग्रेस (३७), शिवसेना ठाकरे गट (१६), राष्ट्रवादी शरद पवार गट (१२), समाजवादी पक्ष (२), भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्सवादी) (१) आणि शेतकरी आणि कामगार पक्ष अशा ६९ आमदारांचा पाठिंबा आहे. ११ चा सहा वर्षांचा कार्यकाळ २७ जुलै रोजी संपणार आहे, त्या जागा भरण्यासाठी निवडणूक आवश्यक आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘वारकरी’ शब्द कसा झाला तयार?, वाचा पंढरीच्या वारीचा इतिहास

नगर सहयाद्री टीम: "विठू नामाचा गजर, टाळ-मृदुंगांचा निनाद आणि माउली-माउलीचा जयघोष" याने आसमंत भारून...

आनंदवार्ता, दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रिय होणार; ‘या’ जिल्ह्यात धो धो बरसणार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांत पुढील चार दिवस दमदार पाऊस होणार असल्याचा...

महिला भजनात दंग, भामट्यांनी दाखवले रंग!, १०० ग्रॅम सोने लंपास..

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री   बंद घराच्या खिडकीची जाळी तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे आठ तोळ्याचे सोन्याचे...

‘कुख्यात गुन्हेगार बंटी राऊत स्थानबद्ध’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील माणीक चौक, लाटे गल्ली येथील उख्यात गुन्हेगार बंटी उर्फ भावेश...