spot_img
अहमदनगरAhmednagar News Today: २००९ ला नकार! पुन्हा २०२३ ला भेट, प्रेमाचा बदला...

Ahmednagar News Today: २००९ ला नकार! पुन्हा २०२३ ला भेट, प्रेमाचा बदला घेण्यासाठी ‘आमिर’ चे ‘भयंकर’ कृत्य

spot_img

कायनेटीक चौकातील प्रकार
अहमदनगर।नगर सहयाद्री
ओळखीचा फायदा घेत मुलाला जीवे मारण्याची धमकी देत विवाहितेवर अत्याचार केल्याची घटना गुरूवारी (दि. २८) दुपारी कायनेटीक चौकातील एका लॉजवर घडली.

याप्रकरणी नगर तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या पीडित विवाहितेने शनिवारी (दि. ३०) दिलेल्या फिर्यादीवरून अमीर हसन शेख (रा. शिक्रापूर ता. शिरूर, जि. पुणे) याच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे.

अमीर शेख यांने फिर्यादीला २००८-०९ मध्ये प्रेमासाठी प्रपोझ केला होता. फिर्यादीने त्याला त्यावेळी नकार दिला होता. फिर्यादीचा २०१० मध्ये विवाह झाला. त्यानंतर २०२२ पर्यंत अमीर शेख हा फिर्यादीच्या संपर्कात नव्हता. ऑक्टोबर २०२२ मध्ये सोशल मीडियाच्या माध्यमांतून ते संपर्कात आले.

त्यांच्यात फोनवर बोलणे देखील होत होते.अमीरने फिर्यादीला बुधवारी (दि. २७) फोन करून गुरूवारी (दि. २८) दुपारी नगर शहरातील पुणे बसस्थानक येथे भेटण्याठी बोलावले होते. फिर्यादी त्यांच्या अल्पवयीन (वय ६) मुलाला घेऊन गुरुवारी दुपारी पुणे बस स्थानकावर गेल्या.

तेथे अमीर आला व त्यांनी एकत्रित चहा घेतला. त्यानंतर अमीर याने फिर्यादीला कायनेटीक चौकातील लॉजवर घेऊन जात मुलाला जीवे मारण्याची धमकी देत अत्याचार केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

बिबट्यांचे हल्ले थांबवा, अन्यथा शस्त्र परवाने द्या, कोणी केली मागणी पहा

पारनेर | नगर सह्याद्री पारनेर तालुयात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्यांचा वावर वाढल्याने शेतकरी, मजूर, शालेय...

हैदराबाद गॅझेट संदर्भात हाय कोर्टाचा मोठा निर्णय, काय दिलाय निर्णय?

मुंबई / नगर सह्याद्री मराठा समाजाला दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. हैदराबाद गॅझेटच्या...

व्होट चोरीवर राहुल गांधींचा सर्वात मोठा बॉम्ब!; मत अ‍ॅड अन् डिलीट कशी केली जातात? सर्व दाखवलं

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - लोकसभा निवडणुकांमध्ये मतचोरी झाल्याचा आरोप काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी...

…तर लक्ष्मण हाकेंना रस्त्यावर ठोकू, लेकीबाळीची इज्जत काढतोय; मराठा क्रांती मोर्चाचा इशारा

मुंबई / नगर सह्याद्री - ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केलेल्या लग्नाच्या वक्तव्यावरून राजकाराण तापलं...