spot_img
अहमदनगरAhmednagar News Today: खुशखबर! 'इतक्या' शेतकर्‍यांचा पीकविमा मंजूर

Ahmednagar News Today: खुशखबर! ‘इतक्या’ शेतकर्‍यांचा पीकविमा मंजूर

spot_img

पारनेर| नगर सहयाद्री
पारनेर तालुक्यातील ३५ हजार ५२३ शेतकर्‍यांना सोयाबीन पीकविमा१६ कोटी रुपये मंजूर झाले असल्याची माहिती भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य विश्वनाथ कोरडे यांनी दिली आहे. पारनेर तालुका कृषी अधिकार्‍यांना घेराव घालत विमा कंपनीला जाब विचारणार्‍या प्रदेश कार्यकारणी सदस्य विश्वनाथ दादा कोरडे यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले असुन पारनेर तालुक्यातील ३५ हजार ५२३ शेतकर्‍यांच्या खात्यावर प्रधानमंत्री पिक विमा योजना २०२३ च्या खरीप हंगामातील सोयाबीन पिकाची अधिसूचना मान्य करत १६.०५ कोटी रुपये अग्रिम रक्कम विमा कंपनी मार्फत लवकरात लवकर वितरीत होणार असल्याची माहिती विश्वनाथ दादा कोरडे यांनी यावेळी दिली.

शेतकर्‍यांना नैसर्गिक आपत्ती, किड रोग यांसारख्या प्रतिकुल परिस्थितीमुळे होणार्‍या नुकसानीपासुन संरक्षण देण्यासाठी शासनाच्या वतीने १ रूपयात राबविण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री पिकविमा योजनेची रक्कम तालुक्यात पडलेला पावसाचा खंड व अत्यल्प स्वरुपातील पाऊस यामुळे शेतकर्‍यांना मिळावी यासाठी कोरडे यांनी सातत्याने नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व दक्षिणेचे विद्यमान खासदार डॉ सुजय विखे पाटील यांसह विमा कंपनी, कृषी विभाग यांच्याशी सातत्याने पत्रव्यवहार केला होता. शेतकर्‍यांना सोबत घेऊन तालुका कृषी अधिकार्‍यांच्या दालनात ठिय्या मांडून विमा कंपनीच्या अधिकार्‍यांना चांगलेच धारेवर धरले होते.

विमा कंपनीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास पुणे येथील कार्यालयावर तालुक्यातील शेतकर्‍यांसह ठिय्या देण्याचा निर्णयही त्यांनी घेतला होता. महाराष्ट्र राज्याचे महसूलमंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी वेळोवेळी दिलेल्या सुचना व आढावा बैठकीत दिलेल्या निर्देशानुसार मध्य हंगाम प्रतिकुल परिस्थिती अंतर्गत जिल्हा प्रशासनामार्फत कार्यवाही करण्यात आली असुन पारनेर तालुका व संगमनेर तालुक्यातील निमोण महसुल मंडळातील शेतकर्‍यांना अद्याप प्रलंबित असलेल्या सोयाबीन व मका पिकाच्या अग्रिम रकमेचे वाटप होणार असल्याचेही कोरडे यांनी यावेळी सांगितले आहे. संबंधित प्रकरणी नगर दक्षिणेचे विद्यमान खासदार डॉ सुजय विखे पाटील यांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले असल्याचे सांगत तालुक्यातील ३५ हजार ५२३ शेतकर्‍यांच्या वतीने विश्वनाथ दादा कोरडे, जिल्हा परिषदेच्या कृषी व बांधकाम समितीचे माजी सभापती काशिनाथ दाते सर, पारनेर भाजपाचे तालुकाध्यक्ष राहुल पाटील शिंदे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख विकास रोहकले, जनसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष सचिन पाटील वराळ, डॉ. भाऊसाहेब खिलारी या सर्वांनीच पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील व खासदार सुजय विखे पाटील विशेष आभारही यावेळी मानले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

खळबळजनक! विकासकामांचे ४५ बनावट जीआर; कोट्यवधींचा पर्दाफाश; नगरमध्ये चाललंय काय?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शासकीय यंत्रणेमध्ये वारंवार विविध घोटाळे, भ्रष्टाचार समोर येत असतानाच आता...

आमदार दाते यांनी पारनेरचे मुद्दे गाजवले!, विधानसभेत पोलिसांच्या शौर्याचा गौरव करत केली मोठी मागणी..

पारनेर । नगर सहयाद्री:- तालुक्यात दिवसेंदिवस वाढत चाललेली कायदा व सुव्यवस्थेची समस्या, अमली पदार्थांचे...

खुशखबर! राज्यात मेगा भरती: मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली मोठी माहिती..

मुंबई । नगर सहयाद्री राज्यात 150 दिवसांच्या उद्दिष्टपूत कार्यक्रमानंतर राज्यात मेगा भरती होणार आहे....

नगर-पुणे प्रवास होणार दीड तासात; नवा रेल्वे मार्ग..

पुणे । नगर सहयाद्री:- बहुप्रतीक्षित पुणे-अहिल्यानगर नवीन रेल्वे मार्ग लवकरच प्रत्यक्षात उतरणार आहे. याबाबत सविस्तर...