पुणे / नगर सह्याद्री : केंद्रीय निवडणूक आयोगाने काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजित पवारांचा असल्याचे स्पष्ट केले. शिवसेनेची घटना व राष्ट्रवादीची घटना वेगळी आहे. परंतु निवडणूक आयोगाने बहुमत कोणाच्या बाजूने? हे पाहून निकाल दिला.
शरद पवार गट केंद्रीय निवडणूक आयोगाच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देईल हेही नक्की. केंद्रीय निवडणूक आयोगाने काल जो निकाल दिला, त्यावर आता घटनातज्ञ उल्हास बापट यांची प्रतिक्रिया आली आहे.
“कालच्या निकालामुळे लोकशाहीची अधःपतन झालं आहे. शिवाय घटनेची पायमल्ली झाली आहे. सुप्रीम कोर्टात निवडणूक आयोगाचा निर्णय रद्द झाला पाहिजे. शिवाय कोर्टाने पक्षांतरबंदी कायद्यात स्पष्टता आणली पाहिजे. ज्याच्याकडे बहुमत त्याच्या बाजूने निकाल देणे चुकीचे आहे” असं उल्हास बापट म्हणाले.
“कालच्या निकालाचा विधानसभा अध्यक्षांवर परिणाम होणार नाही, मात्र ते काय निकाल देतील ते आपल्याला माहिती आहे” असं उल्हास बापट म्हणाले.