spot_img
ब्रेकिंगलोकसभेची उमेदवारी उदयनराजे यांना मिळणार? उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, आम्ही..

लोकसभेची उमेदवारी उदयनराजे यांना मिळणार? उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, आम्ही..

spot_img

सातारा। नगर सहयाद्री-
निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. निवडणूक आयोगाकडूनही जय्यत तयारी सुरू असून लवकरच लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनीही जोरदार तयारी सुरू केली आहे. दरम्यान,आज रविवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उदयनराजेंची राहत्या घरी भेट घेतल्याने उदयनराजेंच्या उमेदवारीबाबत चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलं आहे.

खासदार उदयनराजे भोसले यांचा नुकताच वाढदिवस संपन्न झाला. यापूर्वीही लोकसभेच्या उमेदवारीसाठी साताराचा उमेदवार म्हणून मीच असे संकेत त्यांनी काही दिवसांपूर्वी दिले होते. दरम्यान आज उदयनराजे यांच्या वाढदिवसानिम्मित उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, पहिल्यांदा आम्ही जागावाटप करणार आहोत, जागावाटप झाल्यानंतर ती प्रोसेस होईल. त्यामुळे इतर पक्षांप्रमाणे घोषणा करणार नाही, प्रोसेसनुसार उमेदवारीची घोषणा होईल. आम्ही आता बसून कुणी कोणत्या जागा लढणार यासंदर्भात निर्णय करु. आमची चर्चेची पहिली फेरी झालेली आहे. या फेरीत बऱ्यापैकी प्रश्न सुटले आहे. आणखी दोन तीन फेऱ्या आम्हाला कराव्या लागतील, ज्यामध्ये सर्व प्रश्न सुटतील असेही ती यावेळी म्हणाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पालकमंत्री विखेंवर भाजपची मोठी जबाबदारी; कोल्हेंना…

माजी खा. डॉ. सुजय विखे नगर दक्षिणचे, उत्तर नगर जिल्हा माजी आ. स्नेहलता कोल्हे...

राज ठाकरेंमुळे महाविकास आघाडीत फूट? नेमकं काय घडलं पहा

मुंबई / नगर सह्याद्री - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यामुळे महाविकास आघाडी फुटणार का?...

पवनचक्कीचे कॉपर केबल चोरणारी टोळी जेरबंद; पोलिसांनी असा लावला सापळा

४ गुन्हे उघडकीस; ५ लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त, मुख्य सूत्रधारासह तिघे अटकेत ​अहिल्यानगर /...

​घोसपुरीत दिवसाढवळ्या घरफोडी; दागिन्यांसह मोठा ऐवज लंपास

​अज्ञात चोरट्याविरुद्ध नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; परिसरात भीतीचे वातावरण ​अहिल्यानगर / नगर सह्याद्री...