spot_img
अहमदनगरमातोश्रीवर ठरलं! नगर शहर विधानसभेची जागा ठाकरे गटच लढवणार; कोण-कोण इच्छुक?, वाचा..

मातोश्रीवर ठरलं! नगर शहर विधानसभेची जागा ठाकरे गटच लढवणार; कोण-कोण इच्छुक?, वाचा..

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री
नगर शहर विधानसभा (Nagara Sahara) मतदार संघाची जागा शिवसेना ठाकरे गटच लढवणार आहे. स्थानिक पातळीवर सर्व इच्छुक व पदाधिकाऱ्यांनी एकत्र बसून एक नाव निश्चित करा. यंदा कोणत्याही परिस्थितीत नगरची जागा परत मिळवायची आहे, अशा सूचना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे( Uddhav Thackeray )यांनी नगरच्या पदाधिकाऱ्यांना दिल्या.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल, गुरूवारी मातोश्री येथे नगर जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळीपक्षप्रमुख उध्दव ठाकरे, माजी खासदार विनायक राऊत, आमदार मिलिंद नार्वेकर यांच्या उपस्थितीत नगर शहर व इतर जागांवरील उमेदवारी, सध्याची परिस्थिती, इच्छुकांचा आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे, रावसाहेब खेवरे, शहरप्रमुख संभाजी कदम आदी उपस्थित होते.

नगर शहर मतदारसंघात प्रा. गाडे, संभाजी कदम, बाळासाहेब बोराटे, भगवान फुलसौंदर, गिरीश जाधव उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. पदाधिकाऱ्यांनी व इच्छुकांनी स्थानिक पातळीवर एकत्र बसून उमेदवारीबाबत एकाचे नाव निश्चित करावे. नगर शहर शिवसेनेचा बालेकिल्ला आहे.

त्यामुळे नगरची जागा परत घेण्याच्यादृष्टीने सर्वांनी प्रयत्न करावेत, असे ठाकरे यांनी सांगितले. दरम्यान, मुंबईतील बैठकीपूर्वी खासदार संजय राऊत यांनी नाशिक येथे निवडक पदाधिकाऱ्यांशी नगरच्या जागेबाबत व उमेदवारीबाबत चर्चा केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

कानठळ्या बसविणारे सायलेन्सर पोलिसांनी चालविला रोडरोलर, नेमकं काय केले पहा

पोलिसांनी १३० मॉडिफाइड सायलेन्सरवर चालविला रोडरोलर अहिल्यानगर | नगर सह्याद्री शहरातील कोतवाली, तोफखाना व भिंगार कॅम्प...

लोणीतील सराफ दुकानात जबरी चोरी; कुख्यात गुंडाची टोळी 12 तासांत जेरबंद

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- लोणी येथील अजय ज्वेलर्स दुकानात झालेल्या जबरी चोरीचा गुन्हा केवळ...

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत मोठा निर्णय; ठरलेल्या वेळेतच धुरळा उडणार, पण… , कोर्ट काय म्हणाले

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - जिल्हा परिषदा, पंचायत समितीच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. महाराष्ट्रातील...

नगरमध्ये बिबट्या जेरबंद; बोल्हेगाव परिसरात डरकाळी

अहिल्यानगर । नगर सहयाद्री अहिल्यानगर शहराजवळील तपोवन परिसरात गेल्या काही दिवसांपासून वावर असलेला बिबट्या...