spot_img
अहमदनगरपालकमंत्री, खासदारांकडून पंतप्रधानांसह जनतेची फसवणूक; शहर काँग्रेसकडून पोलखोल

पालकमंत्री, खासदारांकडून पंतप्रधानांसह जनतेची फसवणूक; शहर काँग्रेसकडून पोलखोल

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री – राष्ट्रीय आयुष मिशन अंतर्गत केंद्र सरकारच्या वतीने सुमारे नऊ कोटी रुपये खर्चून उभारलेल्या जिल्हा आयुष्य रुग्णालयाची शहर जिल्हा काँग्रेसकडून [Ahmednagar Congress] ईन कॅमेरा पोलखोल करण्यात आली. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील [Guardian Minister Radhakrishna Vikhe Patil], खा. डॉ. सुजय विखे पाटील [MP Sujay Vikhe Patil] यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खोटी माहिती देऊन फसवणूक करत बंद अवस्थेतील रुग्णालयाचे ऑनलाइन लोकार्पण त्यांच्या हस्ते करवून घेतले. त्यांनी पंतप्रधानांसह जनतेची फसवणूक केल्याचा आरोप शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केला.

काळे यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांसह आयुष्य रुग्णालयाची पाहणी केली. यावेळी पंतप्रधान, पालकमंत्री, जिल्हा प्रशासनाच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. मागील महिन्यात २६ ऑटोबरला शिर्डी येथे पंतप्रधान आले असता त्यांनी ऑनलाईन राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालक मंत्री, खासदार यांच्या उपस्थितीत लोकार्पण केले होते. काँग्रेसने केलेल्या पाहणीत प्रत्यक्षात रुग्णालय बंद अवस्थेत आढळले. यामुळे काळे यांनी उपस्थित दोन डॉटर, कर्मचार्‍यांना फैलावर धरले.

काँग्रेसच्या पाहणीत रुग्णालयाच्या बिल्डिंगमध्ये असणारे स्री पंचकर्म कक्ष, रक्त तपासणी प्रयोगशाळा, वैद्यकीय अधिकार्‍यांचे कक्ष, उपकर्म कक्ष, मेडिकल स्टोअर, अंतररुग्ण कक्ष, लेखा विभाग, बाह्यरुग्ण कक्ष, इलाज बीज तदबीर कक्ष, योगा बाह्यरुग्ण कक्ष, निसर्ग उपचार कक्ष, योग सभागृह, गर्भसंस्कार व हिरकणी कक्ष, शस्त्रक्रिया विभाग सर्व बंद अवस्थेत आढळले. बिल्डिंगमध्ये धुळीचे साम्राज्य असून आवारात प्लास्टिक, जागोजागी कचरा आढलला. येथे होमिओपॅथिक, आयुर्वेदिक, युनानी, योग अशा चार शाखांच्या उपचार पद्धती केंद्र सरकारच्या योजनेतून उभारल्या आहेत.

काळे म्हणाले, नगरसह जिल्ह्यातील महिला, बालक, गोरगरीब जनतेसाठी कोट्यवधी रुपये खर्चून हे रुग्णालय उभारण्यात आले. पंतप्रधानांच्या हस्ते केवळ फोटो सेशन करुन बंद अवस्थेत लोकार्पण केले. लोकार्पण झाल्यामुळे जिल्ह्यातून रोज या ठिकाणी रुग्ण उपचारासाठी येतात. मात्र त्यांना रिकाम्या हाती परतावे लागते. प्रसिद्धीच्या हव्यासापोटी पालकमंत्री, खासदारांनी हा निंदनीय प्रकार केला. अशा लोकप्रतिनिधींवर जनतेने काय विश्वास ठेवायचा? बिल्डींगची उभारणी सदोष असल्याचा आरकोपही त्यांनी केला.

यावेळी मनपाचे माजी विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे, माजी नगरसेवक संजय झिंजे, माथाडी काँग्रेस जिल्हाध्यक्ष विलास उबाळे, क्रीडा व युवक काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष आकाश आल्हाट, गणेश चव्हाण, विकास भिंगारदिवे, सोफियान रंगरेज, जयराम आखाडे, देवराम शिंदे, बाबासाहेब वैरागर, दीपक काकडे, रोहिदास भालेराव, मुस्तफा खान, भैय्यासाहेब पटेल आदी उपस्थित होते.

अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा
जिल्हा आयुष रुग्णालयाची पाहणीनंतर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. घोगरे यांच्याशी काळे यांनी संपर्क साधला. सिव्हील हॉस्पिटल येथे जिल्हा आयुष अधिकारी डॉ. घुगे यांची भेट घेण्यात आली. यावेळी काळे यांनी वरिष्ठ अधिकार्‍यांना देखील जाब विचारला. १७ नोव्हेंबर पर्यंत भरतीसाठी अर्ज सादर करण्याची जाहिरात देण्यात आली होती. यामध्ये हजारो अर्ज आले आहेत. वास्तविक पाहता प्रशासनाने या बाबींची पूर्तता लोकार्पण होण्या पूर्वीच करायला हवी होती असे म्हणत काळे यांनी संताप व्यक्त केला. पुढील आठ दिवसांच्या आत भरती प्रक्रिया पूर्ण करून या ठिकाणी निर्धारित साठ लोकांच्या स्टाफसह सर्व सोयी सुविधांसह खर्‍या अर्थाने लोकार्पण करून शहरासह जिल्ह्यातील गोरगरिबांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. अन्यथा काँग्रेसच्या वतीने पालकमंत्री, दक्षिणचे खासदार, जिल्हा प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा काळे यांनी दिला.

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

दीपिकाला रुग्णालयातून डिस्चार्ज, चिमुकल्या परीसह घरी परतले ‘माता-पिता’

Deepika Padukone: प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणला आज (रविवारी) रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. दीपिका...

एसटी महामंडळाचा ‘मोठा’ निर्णय; ‘लालपरी’ मध्ये अडचण आल्यास करा ‘हे’ काम!

मुंबई : नगर सह्याद्री:- प्रवाशांच्या समस्यांचे तातडीने निराकरण करण्यासाठी एसटी महामंडळाने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला...

नागरिकांमध्ये मोठी नाराजी; ‘त्या’ रस्त्यावर अवैध व्यवसाय करणाऱ्या महिला, कडक कारवाई होणार?

Maharashtra News: आळंदी पुणे रस्त्यावरील वाढते हॉटेल-लॉज आणि अवैध व्यवसाय करणाऱ्या महिला परिसरात दिसत...

मोठी बातमी! मुख्यमंत्री देणार दोन दिवसांत राजीनामा’; ‘भाजपने नवा ‘फॉर्म्युला’ तयार केला..

Politics News: दोन दिवसांत मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची घोषणा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली...