spot_img
ब्रेकिंगतारीख पे तारीख! 'शिवसेना' सुनावणी पुढे ढकलली

तारीख पे तारीख! ‘शिवसेना’ सुनावणी पुढे ढकलली

spot_img

नवी दिल्ली | वृत्तसंस्था
गेल्या अडीच-तीन वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या वादाबाबतच्या प्रकरणाची सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. सर्वोच्च न्यायालय बुधवारी शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत महत्त्वाचा निकाल देईल, अशी चर्चा रंगली होती. मात्र, ऐनवेळी सशस्त्र सुरक्षा दलांसंदर्भात एक महत्त्वाचे प्रकरण सुनावणीला आल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने इतर प्रकरणांची सुनावणी आटोपती घेतली.

त्यामुळे आजही सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या वादाबाबत अंतिम युक्तिवाद होऊ शकला नाही. आता सर्वोच्च न्यायालयात 12 नोव्हेंबरला याप्रकरणाची पुढील सुनावणी आहे. त्यामुळे या खटल्याबाबत तारीख पे तारीख, हा प्रकार पु्‌‍न्हा एकदा पाहायला मिळाला.सुनावणीपूवच सर्वोच्च न्यायालयाने ठाकरे गट आणि शिंदे गटाला तुमच्या प्रकरणाची सुनावणी थोडक्यात होईल, असे स्पष्ट केले होते.

यावर ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी सुनावणी शक्य नसेल तर पुढची तारीख द्या, अशी विनंती केली. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने 12 नोव्हेंबरची तारीख दिली. त्यामुळे याप्रकरणाची पुढील सुनावणी 12 नोव्हेंबरला होईल. शिंदे गटाकडे सध्या शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह असल्याने त्यांना सुनावणीची फारशी घाई नाही. त्यामुळे शिंदे गटाने याप्रकरणाची सुनावणी डिसेंबर महिन्यात घेतली तरी चालेल, असे म्हटले.

यावर कपिल सिब्बल यांनी शक्य तितक्या तातडीच्या सुनावणीसाठी आग्रह धरला. तुम्हाला अंतिम युक्तिवादासाठी किती वेळ लागेल, असा प्रश्न न्यायालयाने सिब्बल यांना विचारला. त्यावर सिब्बल यांनी मी 45 मिनिटांत युक्तिवाद पूर्ण करेन, असे सांगितले. येत्या जानेवारी महिन्यात महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. त्यापूव पक्ष आणि चिन्हाबाबतची सुनावणी होणे आवश्यक आहे. त्यामुळे लवकरची तारीख द्यावी, अशी विनंती कपिल सिब्बल यांनी केली. तेव्हा न्यायालयाने ही सुनावणी 12 नोव्हेंबरला होईल, असे सांगितले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मराठा आंदोलकांवरील ११ गुन्हे मागे घेण्यास मान्यता, न्यायालयीन प्रक्रिया सुरू

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- मराठा आरक्षणासाठी झालेल्या आंदोलनादरम्यान नगर जिल्ह्यात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांपैकी...

नगर हादरले! धाकट्या भावाने केला मोठ्या भावावर वार; वाचा अहिल्यानगर क्राईम

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- स्टेशन रोडवरील न्यू बेथेल कॉलनीत कौटुंबिक वादातून दारूच्या नशेत असलेल्या...

शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार; आमदार शिवाजीराव कर्डिले यांची मोठी माहिती, वाचा पत्रकार परिषद

अहिल्यानगर | नगर सह्याद्री सप्टेंबर महिन्यात झालेल्या सततच्या पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारकडून भरघोस निधी देण्यात...

शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत करा; ठाकरे गटाची मागणी, तहसीलदारांना निवेदन

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या, घरे व पशुधनाच्या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना तातडीने...