जालना / नगर सह्याद्री : मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील आज सकाळी अंतरवली सराटी गावातून निघाले तेव्हा सगळीकडे भावनिक वातावरण झाले होते. आपण परत येऊ का माहिती नाही, पण आपले विचार जिवंत ठेवावेत, मराठा आरक्षणाची लढाई कायम ठेवावी, असं आवाहन त्यांनी यावेळी जमलेल्या लोकांना केले होते.
मनोज जरांगे यांनी गाव सोडलं तेव्हा संपूर्ण गावकरी भावूक झाले. जरांगे यांचा मोर्चा जालन्याच्या शहागड गावात पोहोचला तेव्हा अतिशय भावूक क्षण बघायला मिळाला. मनोज जरांगे यांचं संपूर्ण कुटुंब जरांगेंच्या भेटीसाठी आलं होतं. मनोज जरांगे यांच्या पत्नी, तीन मुली आणि मुलगा जरांगेंना कवटाळत होते. सर्वांच्या डोळ्यांमध्ये अश्रू होते. यावेळी जरांगे स्वत:ला सावरण्याचा प्रयत्न करत होते. ते आपल्या पोटच्या लेकरांच्या डोक्यावर मायेचा हात फिरवत होते. जरांगे यांच्या पत्नी यावेळी ढसाढसा रडत होत्या. जरांगेंच्या पत्नींनी त्यांना ओवाळलं. त्यानंतर त्यांना एक घट्ट मिठी मारली. त्यांच्यासोबत तीन मुली होत्या. या मुलीदेखील आपल्या वडिलांना बिलगत होत्या. जरांगेच्या डाव्या बाजूला मुलगा होता. तो वडिलांना सावरत होता.
मुलीचं जरांगेंना आवाहन
जरांगे यांच्या तीनही मुलींनी आपल्या वडिलांना जिंकून येण्यासाठी शुभेच्छा दिल्या. “मला लहान मुलीने सांगितलं आहे की, पप्पा 26 जानेवारीला शाळेत कार्यक्रम आहे, विजय घेऊन याल तर डायरेक्ट शाळेत विजय घेऊन या असं मुली म्हणाल्या आहेत.