spot_img
ब्रेकिंगग्रामपंचायतमध्ये राडा! माजी सरपंचासह सदस्यावर गुन्हा दखल, नेमकं प्रकरण काय?

ग्रामपंचायतमध्ये राडा! माजी सरपंचासह सदस्यावर गुन्हा दखल, नेमकं प्रकरण काय?

spot_img

पारनेर। नगर सहयाद्री
पारनेर तालुयातील वारणवाडी येथील सरपंच पदाच्या निवड प्रक्रियेत गोंधळ घालत कागदपत्रे फाडल्या प्रकरणी वारणवाडीचे माजी सरपंच संतोष खंडू मोरे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य रोशनी सुनील काशीद यांच्यावर ग्रामपंचायत अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंडलाधिकारी अशोक डोळस यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.

फिर्यादीत म्हटले आहे, तहसील कार्यालय, पारनेर यांच्या आदेशानुसार वारणवाडी ग्रामपंचायतच्या सरपंच निवडणुकीकरिता २७ फेब्रुवारी २०२४ रोजी अध्यासी अधिकारी म्हणून नेमणूक होती. ४ मार्च रोजी सकाळी १० ते १२ ही नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याची वेळ होती. सरपंच पदासाठी ग्रामपंचायत सदस्य संजय शंकर काशीद व रोशनी सुनील काशीद असे दोघांचे अर्ज आले होते. याची निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर संजय शंकर काशीद हे यात विजयी झाले.

रोशनी सुनील काशीद यांनी मतदान न केल्याच्या रागातून संतोष खंडू मोरे यांच्याशी वाद घातला. यावेळी रोशनी यांना पडलेल्या मतदानाच्या ३ मतपत्रिका संतोष मोरे या सदस्याने फाडून फेकून दिल्या. रोशनी यांनीही कागदपत्रांची फाडाफाडी केली. याबाबत गुन्हा दाखल केला असून घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली साह्य. फौजदार संदीप गायकवाड करत आहेत.

महसूल विभागाची बोटचेपी भुमिका?
वारणवाडीच्या सरपंच पदाच्या निवडीमध्ये माजी सरपंचासह ग्रामपंचायत सदस्याने थेट अधिकार्‍यांना शिवीगाळ व दमबाजी करत थेट निवडणूक प्रक्रियेचीच कागदपत्र फाडून टाकत खिडकीतून फेकून दिली आहे. तर एका ग्रामपंचायत सदस्याला ताब्यात घेत त्याला मतदान करून दिले नाही्. हा सर्व प्रकार निवडणूक निर्णय अधिकारी अशोक डोळस यांच्यासह बंदोबस्ताला नियुक्त असलेले पोलीस यांच्यासमोर घडला असतानाही शासकीय कामात अडथळा हा गुन्हा दाखल करणे ग्रामस्थांना अपेक्षित होते. परंतु मंडलाधिकारी अशोक डोळस यांनी तहसीलदारांच्या चर्चेअंती ग्रामपंचायत अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला असून महसूल विभागाची बोटचेपी भूमिका चर्चेचा विषय ठरली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लाडक्या बहिणींना १५०० मिळणार की २१००? मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टच सांगितले…

मुंबई / नगर सह्याद्री - Ladki Bahin Yojana 6th Installment: लाडकी बहीण योजनेचा पुढील...

अहिल्यानगरमध्ये खळबळजनक प्रकार?; एटीएममध्ये ‘हेराफेरी’

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री :- केडगाव येथील एका नामांकित बँकेच्या एटीएमला पटटी चिटकवत 40 हजार रुपयांची...

कांदा कोसळला; शेतकरी आक्रमक

सोलापूर-नाशिकमध्ये लिलाव बंद | मनमाड-येवला महामार्गावर रास्तारोको नाशिक | नगर सह्याद्री गेल्या 10 दिवसांत कांद्याचे क्विंटल...

मनपाचे दोन कर्मचारी निलंबित; कारण आलं समोर..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- महापालिकेच्या मार्केट विभागातील कथित हप्तेखोरीच्या समाजमाध्यमातून प्रसारित झालेल्या ध्वनिफितीसंदर्भात आयुक्त तथा...