अहमदनगर । नगर सहयाद्री-
जिल्ह्यतील कोपरगाव तालुक्यातील सबजेल कारागृहात धक्कादायक प्रकार घडला आहे. मिशी कापण्यासाठी असलेल्या छोट्या कात्रीने एका कैद्याच्या हाता पायावर वार करण्यात आले आहे याप्रकरणी सहा जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी: कोपरगाव येथील सबजेलमधील चार नंबरच्या बराकीत शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास भैया उर्फ नयन शिंदे, भारत आव्हाड, अतुल आव्हाड, आकाश माकोणे, विकी शिंदे (सर्व रा. कोपरगाव), विशाल कोते (रा. शिर्डी) या कैद्यांमध्ये आपसात भांडणे सुरू होती. त्यावेळी दानिश शेरखान पठाण (रा. इंदिरानगर कोपरगाव) हा अन्य कैदी तिथे होता.
यावेळी आकाश माकोणे याने दानिशला धक्का देऊन शिवीगाळ केली. त्यावर दानिश मला विनाकारण शिवीगाळ का करतो असे म्हणाला. त्यावर सर्व सहा कैदी एकत्र आले. त्यांनी दानिशला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. विशाल कोते याने त्याच्या हातात असलेल्या मिशी कापायची बारीक कात्रीने दानिशच्या हाता-पायावर वार केले आहे.