spot_img
अहमदनगरतरूणांमध्ये क्रेज! खासदार विखे पाटील 'सेल्फी आयकॉन'

तरूणांमध्ये क्रेज! खासदार विखे पाटील ‘सेल्फी आयकॉन’

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री
लोकसभा निवडणुकीमध्ये तरुण नवमतदार महत्वाची भूमिका बजावणार आहेत. यामुळे तरुणांना आकर्षित करण्यासाठी सर्वच राजकारणी सोशल मीडियाचा वापर करत त्यांच्या पर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करत आहेत. अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार आणि महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील हे अग्रेसर आहेत. तरुणांमध्ये त्यांचे क्रेज वाढत असून त्यांच्या बरोबर सेल्फी काढण्यासाठी तरुणांची मोठी झुंबड पहायला मिळत आहे. तरुणांमधील डॉ. सुजय विखे यांचे क्रेज ही विरोधकांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहेत.

लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात नव मतदार मतदान करणार आहेत. तरुणांमध्ये सेल्फीचे मोठे क्रेज आहे. आपल्या आवडत्या नेत्याबरोबर सेल्फी काढण्याचा उत्साह वेगळाच असल्याचे अनेक तरुण विविध उमेदवाराबरोबर सेल्फी काढून सोशल मिडियाच्या खात्यावर प्रसारित करत आहेत.

नगरमध्ये ही हे क्रेज तरुणाईमध्ये पहायला मिळत आहे. त्यात सुजय विखे पाटील यांना मोठी पसंती मिळत आहे. सुजय विखे यांनी प्रचाराच्या निमित्त प्रचार सभा आणि गाठी भेटींचा सपाटा लावला आहे. दररोज विविध ठिकाणी डॉ. सुजय विखे पाटील मतदारांच्या गाठी भेटी घेत आहेत. यावेळी सभा संपल्यावर मोठ्या प्रमाणात तरुण सेल्फी काढण्यासाठी त्यांच्या भोवती गरडा घालत आहेत.

प्रचाराच्या दरम्यान लोकांशी संवाद साधताना ठिकठिकाणी त्यांच्या भोवती तरुणांचा वेढा निर्माण होऊन सेल्फी काढण्याची मागणी करतात. सुजय विखे पाटील ही तरुणांच्या मागणीला हसून प्रतिसाद देतात. यामुळे समाज माध्यमावर सर्वत्र त्यांचे फोटो दिसत आहेत. यामुळे सुजय विखे यांना आता सेल्फी आयकॉन म्हणुन ओळख मिळत आहे. तरुणामध्ये सुजय विखेची वाढती पसंती ही विरोधकांसाठी धोकादायक असल्याने त्यांना काऊंटर करण्यासाठी विरोधकांकडून विविध युक्त्या आखल्या जात आहेत.

पण त्याचाही फायदाच सुजय विखे यांना होताना दिसत आहे. कारण कोणतेही विरोधात्मक विधाने न करता, केवळ विकास कामाचे मुद्दे घेऊन सुजय विखे प्रचार करत असल्याने त्यांच्या विरोधात व्ययक्तिक स्वरुपाच्या होणार्‍या टिकांना तरुणच उत्तरे देताना दिसत आहेत. यामुळे तरुणाईमध्ये सोशल मीडियाच्या पडद्यावर डॉ. सुजय विखे पाटील यांचा विजय झाल्याचे दिसून येत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘वारकरी’ शब्द कसा झाला तयार?, वाचा पंढरीच्या वारीचा इतिहास

नगर सहयाद्री टीम: "विठू नामाचा गजर, टाळ-मृदुंगांचा निनाद आणि माउली-माउलीचा जयघोष" याने आसमंत भारून...

आनंदवार्ता, दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रिय होणार; ‘या’ जिल्ह्यात धो धो बरसणार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांत पुढील चार दिवस दमदार पाऊस होणार असल्याचा...

महिला भजनात दंग, भामट्यांनी दाखवले रंग!, १०० ग्रॅम सोने लंपास..

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री   बंद घराच्या खिडकीची जाळी तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे आठ तोळ्याचे सोन्याचे...

‘कुख्यात गुन्हेगार बंटी राऊत स्थानबद्ध’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील माणीक चौक, लाटे गल्ली येथील उख्यात गुन्हेगार बंटी उर्फ भावेश...