विविध ३३ गुन्ह्यांत पाच लाख ९४ हजारांचा मुद्देमाल जप्त
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी आदेश दिल्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने जिल्ह्यात विविध ठिकाणी अवैध धंद्यांवर छापे मारून पाच लाख ९४ हजार ६० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी पोलीस अंमलदार संदीप पवार, गणेश धोत्रे, अतुल लोटके, मयूर गायकवाड, आकाश काळे, शाहीद शेख, पंकज व्यवहारे, प्रमोद जाधव, अमृत आढाव, महादेव भांड, विश्वास बेरड, बिरप्पा करमल, बाळासाहेब नागरगोजे, भगवान थोरात, रोहित मिसाळ, ज्योती शिंदे, उमाकांत गावडे, हृदय घोडके, गणेश भिंगारदे, रवींद्र घुंगासे, जालिंदर माने, रोहित येमूल, गणेश लोंढे, सोमनाथ झांबरे, रणजीत जाधव, रमीजराजा आत्तार, विशाल तनुपरे अशांची पाच पथक तयार केली. त्यांना तोफखाना, एमआयडीसी, जामखेड, बेलवंडी, लोणी व संगमनेर शहर पोलीस ठाणे हद्दीतील अवैध धंद्यांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या व पथक रवाना केले.
गेल्या १२ मे रोजी पथकातील पोलीस अंमलदार यांनी तोफखाना, एमआयडीसी, जामखेड, बेलवंडी, लोणी व संगमनेर शहर पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध व्यावसायिकांची माहिती काढून, छापे टाकले. त्यात अवैध दारू, जुगार व अवैध वाळू वाहतूक करणार्यांविरुद्ध कारवाई केली. या कारवाईमध्ये एकूण ३३ गुन्हे दाखल करण्यात आले व त्यांच्याकडून पाच लाख ९४ हजार ६० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यात तोफखाना जुगार सहा गुन्हे दाखल, आठ हजार २०० रुपयांचा माल जप्त, दारू दोन गुन्हे, आठ हजार ३९० रुपयांचा माल जप्त. एमआयडीसी दारूचे सहा गुन्हे, २६ हजार ८७५ रुपयांचा माल जप्त, जुगाराचा एक गुन्हा एक हजार ३४० रुपयांचा माल जप्त. जामखेड दारूचे आठ गुन्हे, १८ हजार ८९५ रुपयांचा माल जप्त.
बेलवंडी दारूचे चार गुन्हे, ३१ हजार २९० रुपयांचा माल जप्त. लोणी अवैध वाळूचा एक गुन्हा, तीन लाख १० हजारांचा माल जप्त. संगमनेर शहर जुगाराचे पाच गुन्हे, एक लाख ८९ हजार ७० रुपयांचा माल जप्त. असे एकूण ३३ गुन्हे दाखल करून पाच लाख ९४ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशानुसार श्रीरामपूरचे अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, अहिल्यानगरचे अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.