spot_img
अहमदनगरदेशाला एका कणखर नेतृत्वाची गरज: चेअरमन शिवाजीराव कर्डीले

देशाला एका कणखर नेतृत्वाची गरज: चेअरमन शिवाजीराव कर्डीले

spot_img

अहमदनगर नगर सह्याद्री
देशाला एका कणखर नेतृत्वाची गरज आहे आणि नरेंद्र मोदी हेच त्याला पर्याय आहेत. यामुळे नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी महायुतीच्या उमेदवारा विजयी करा असे आवाहन माजी मंत्री तथा जिल्हा बॅं
केचे चेअरमन शिवाजीराव कर्डीले यांनी केले आहे. ते नगर तालूक्यातील महायुतीच्या सभेत बोलत होते. यावेळी त्यांनी महायुतीचे उमेदवार खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या कामाबद्दल मतदारांना माहिती दिली.

तालूक्यातील येथे महायुतीचे उमेदवार खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ महायुतीच्या मेळाव्याचे इमामपूर येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बाजार समिती संचालक मधुकर मगर, दत्ता तापकीरे, धर्मनाथ आव्हाड, चेअरमन डॉ. मिनीनाथ दुसुंगे, संचालक डॉ. राजेंद्र ससे, आदेश भगत, सुरेश वारूळे उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारने देशात मागील १० वर्षात विविध विकास कामे करून देशाला प्रगतीच्या पथावर आणले आहे. शेतकरी, कष्टकरी, तरूण, महिला आणि विद्यार्थांसाठी विविध योजना राबविल्या आहेत. यामुळे देशातील प्रत्येक घटकाचा विकास झाला. यामुळे येणाऱ्या काळात पंतप्रधान मोदींच्या हातात देश अधीक बळकट आणि सुरक्षित होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

महायुतीचा उमेदवार हा प्रतिमोदी असून तुमचे मत हे सरळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळणार आहे. म्हणून महायुतीच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी काम करा असे आवाहन त्यांनी केली. खा.सुजय विखे पाटील यांनी आपल्या खासदारीच्या काळात केलेल्या कामांची माहिती त्यांनी मतदारांना दिली. येणाऱ्या काळात अहिल्यानगच्या विकासासाठी एक तरूण आणि महत्वाकांक्षी खासदार आपल्याला निवडून द्यायचा आहे असेही ते म्हणाले.

विखे कुटुंबाचे विकास हेच ध्येय
विखे कुटुंबाने विकास हेच ध्येय ठेऊन नगरसाठी काम केले आहे. माझ्या पाच वर्षाच्या छोटाशा काळात मला जितके शक्य झाले, तितकी विकास कामे केली आहेत आणि ती कामे आज नगर मध्ये दिसतात. येणाऱ्या काळातही पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली नगर जिल्ह्यात जास्तीत जास्त निधी मिळवून विकासकामे केली जातील. त्यात पायाभूत सेवा सुविधांपासून अत्याधुनिक सेवांचा समावेश आहे.  नगरमधील विविध प्रश्न येणाऱ्या काळात संसदेत मांडून त्याचे समाधान केले जाईल. 

– खासदार सुजय विखे पाटील

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

बिबट्याच्या हल्ल्यात पारनेर तालुक्यात 40 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

  कळस परिसरात ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण; वनविभागाकडे तातडीने कारवाईची मागणी गणेश जगदाळे / नगर सह्याद्री : पारनेर...

सरकार झुकलं! मागण्या मान्य पण जरांगे पाटलांनी पुन्हा सरकारला दिला ‘हा’ इशारा

मुंबई / नगर सह्याद्री - मनोज जरांगे यांच्या मागण्याचा सरकारकडून जीआर काढण्यात आला आहे....

पानटपरीवर गॅंगवार; कोयत्याने सपासप वार! शहरात गुन्हेगारांचा कहर, चाललंय काय?, वाचा सविस्तर..

Ahilyanagar Crime News: पानटपरीवर बसलेल्या युवकावर दहा जणांच्या टोळक्याने प्राणघातक हल्ला केला. मित्राचे भांडण...

सबसे हटके गौतमी पाटील झटके! ‘टीप टीप बरसा पाणी’ वर स्विमिंग पूलमध्ये डान्स, पहा व्हायरल व्हिडीओ..

मुंबई | नगर सहयाद्री लोकप्रिय लावणी कलाकार आणि सोशल मीडिया स्टार गौतमी पाटील पुन्हा...