corona Update: कोरोनाच्या जेएन १ या उपप्रकाराचा रुग्ण केरळमध्ये आढळल्यानंतर राज्यामध्ये सावधगिरी बाळगण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहे. नागरिकांनी आवश्यकतेनुसार गरजेच्या ठिकाणी मास्क घालणे, वारंवार हात धुणे आणि कोरोना प्रतिबंध करणारे वर्तन करणे गरजेचे असल्याचे निर्देश राज्याच्या आरोग्य विभागाने दिले आहेत. केरळ पाठोपाठ पुण्या-मुबंईत ही नव्या व्हेरियंटाईने शिरकाव केला आहे.
केरळमध्ये वीन व्हेरियंटचा पहिला रुग्ण आढळला. केरळ पाठोपाठ पुण्या-मुबंईत ही व्हेरियंटचा शिरकाव झाला आहे. ठाण्यात पुनवीन व्हेरियंट jn 1 च्या पाच रुग्ण मिळाले आहे. तर पुणे शहरात जेएन व्हेरियंटचे दोन तर रुग्ण आढळले आहे. या सर्वांना ताप आसल्याने त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली. त्यानंतर त्यांचे नमुने लॅबमध्ये पाठवण्यात आले होते त्यानंतर नवीन व्हेरीएन्टचे हे रुग्ण पॉझिटीव्ह असल्याचे उघड झाले आहे पुणे शहरात अमेरिकेतून आलेल्या तरुणाला व्हेरियंटची लागण झलेली होती.
मंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण
कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याने आरोग्य विभाग अलर्ट झाला आहे. मंत्री धनंजय मुंडे कोरोना पॉझिटिव्ह असल्याची बातमी समोर आली आहे. मंत्री मुंडे काही दिवसांपासून खोकल्याने त्रस्त होते. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी त्यांनी कोरोना चाचणी केली असता ही चाचणी पॉझिटिव्ह आली. तेव्हापासून मुंडे हे पुण्यातील आपल्या घरी विलगीकरणात असून तिथेच ते औषधोपचार घेत आहेत.