spot_img
अहमदनगरसंगमनेरात वादाचा भडका! आक्षेपार्ह वक्तव्यामुळे थोरात समर्थक आक्रमक : गाड्या फोडल्या, जाळपोळ,...

संगमनेरात वादाचा भडका! आक्षेपार्ह वक्तव्यामुळे थोरात समर्थक आक्रमक : गाड्या फोडल्या, जाळपोळ, रास्तारोको..

spot_img

संगमनेर | नगर सह्याद्री:-
विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने विखे-थोरात गटातील संघर्षाचा अखेर भडका उडाला. धांदरफळ येथील विखेंच्या सभेतून महिलांचा अवमान झाल्याचा आरोप करत थोरात समर्थक कार्यकर्ते आक्रमक झाले असून तालुक्यात तीव्र पडसाद उमटले आहेत. काही गाड्यांची चिखली परिसरात तोडफोड करण्यात आली असून एका गाडीची जाळपोळ झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. दरम्यान, संतप्त महिलांनी धांदरफळ येथील सभास्थळी ठिय्या देत घोषणाबाजी केली. तालुका पोलीस स्थानकात कार्यकर्त्यांच्या ठिय्या दिला. थोरात समर्थक आक्रमक झाल्याने संगमनेरमध्ये शनिवारीही तणावाचे वातावरण होते.

शुक्रवारी सायंकाळी धांदरफळ बु येथे भाजपची युवा संकल्प सभा होती. डॉ. सुजय विखे यांच्या प्रमुख उपस्थितीत असलेल्या या सभेत वसंतराव देशमुख यांची जीभ घसरली. देशमुख यांनी युवक काँग्रेस नेत्या डॉ. जयश्री थोरात यांच्याबाबत अत्यंत आक्षेपार्ह टिप्पणी केली. विखे-थोरात कुटुंबातील तरुण पिढीत सध्या आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. बाप या शब्दावरून राजकारण पेटलेले असतानाच देशमुखांनी महिला नेत्यावर टीका करताना पातळी सोडल्याचा दावा केला जात आहे. देशमुख बोलत असताना मंचावर उपस्थित काही जाणत्या कार्यकर्त्यांनी त्यांना हटकले, मात्र भान सुटल्याचे त्यांना बऱ्याच वेळांनतर लक्षात आल्याचे म्हटले जात आहे. याचे पडसाद तालुक्यात उमटले.

सोशल मीडियातून ही वार्ता वेगाने पसरली. त्यानंतर शेकडो महिला, कार्यकर्ते धांदरफळ येथील सभास्थळी धावून गेले. धांदरफळ येथे विखेंच्या सभेनंतर स्थानिक थोरात समर्थक महिला आणि कार्यकर्त्यांनी, सभास्थळी ठिय्या देत देशमुख यांच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली. देशमुखांच्या अटकेची मागणी करण्यात आली. सभा आटोपून परतणाऱ्या कार्यकर्त्यांच्या गाड्यांना संतापाचा फटका बसला. अकोले नाका परिसरातील पुलाखाली, खांडगाव दुध डेअरी समोर चिखली येथे 10:30 च्या सुमारास संतप्त कार्यकर्त्यांनी गाडीच्या काचा फोडल्याची घटना घडली.

त्यानंतर एका गाडीची जाळपोळही झाली. संगमनेर पालिकेच्या अग्निशमन बंबाने घटनास्थळी धाव घेत आग विझवली. यानंतर संतप्त कार्यकर्त्यांनी आपला मोर्चा तालुका पोलीस स्थानकाकडे वळवला. याठिकाणी ठिय्या आंदोलन करून डॉ. सुजय विखे यांच्या विरोधात घोषणाबाजी करत त्यांच्या अटकेची मागणी करण्यात आली. गाड्यांची तोडफोड आणि जाळपोळ झाल्याची माहिती मिळताच पोलीस तातडीने परिस्थिती नियंत्रणासाठी फौजफाटा तैनात करण्यात आला. दरम्यान याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

खळबळजनक! झाडाझुडूपात आढळला अज्ञात तरुणाचा मृतदेह

श्रीरामपूर । नगर सहयाद्री श्रीरामपूर शहराजवळ खैरीनिमगाव व भैरवनाथनगर शिवारात अज्ञात तरुणाचा कुजलेल्या अवस्थेतील...

गरोदर महिलेवर जंगलात अत्याचार; दोघा नराधमाचं संतापजनक कृत्य!

Maharashtra Crime News: एक हादरवणारी घटना समोर आली आहे. रात्रीच्या सुमारास घरात घुसून परिवाराला...

४ टक्के व्याजदरात ५ लाखाचे कर्ज; बळीराजासाठी सरकारची योजना?, वाचा सविस्तर

Kisan Credit Card Scheme: केंद्र सरकारने देशभरातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक योजना पुढे आणली आहे....

नगरमध्ये चाललंय काय?, जनतेच्या जीवाशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरांवर कारवाई

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- कोणतीही वैद्यकीय पदवी नसताना, वैद्यकीय व्यावसायिक नसताना दवाखाना चालवून, रूग्णांवर...