spot_img
अहमदनगरआयुक्त साहेब, चमकोगिरी नको फिल्डवर काम दाखवा; कोतकर काय म्हणाले पहा...

आयुक्त साहेब, चमकोगिरी नको फिल्डवर काम दाखवा; कोतकर काय म्हणाले पहा…

spot_img

मनोज कोतकर | मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट | आंदोलनाचा इशारा

अहिल्यानगर | नगर सह्याद्री

नगर शहरात भटया कुत्र्यांना आवर घालण्यासाठी महापालिका फक्त कागदी घोडे नाचवत आहे. आयुक्त साहेबांनी सोशल मीडिया, प्रसार माध्यमांवरील चमकोगिरी थांबवून प्रत्यक्ष फिल्डवर काम करून दाखविले पाहिजे. अन्यथा तुमच्या दालनासह महापालिकेच्या आवारात भटकी कुत्री सोडून आंदोलन केले जाईल असा आक्रमक इशारा महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती मनोज कोतकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिला आहे.

नगर शहर व उपनगरांत मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे. गुलमोहोर रोडवर कोहिनूर मंगल कार्यालयासमोर भटके कुत्रे गाडीला आडवे आल्याने दोन युवती जखमी झाल्या. याच परिसरात मोकाट कुत्र्यांनी तीन वर्षांच्या बालकावर हल्ला केला. नागरिकांच्या सतर्कतेने सुदैवाने मोठी दुर्घटना टळली.  केडगाव, सोनेवाडी रोड परिसरातील सहा नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतला. रात्रीच्या वेळी तर शहर व उपनगरांत कुत्र्यांच्या झुंडींमुळे नागरिकांना घराबाहेर पडताना १० वेळा विचार करावा लागतो आहे. शहरात मोकाट कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. अशा वेळी मनपा प्रशासन, विशेषतः मनपा आयुक्त यशवंत डांगे हे फक्त पाणीपट्टी वाढ तसेच इतर कामांत व्यग्र आहेत. नागरिकांकडून कर जरूर घ्या पण त्यांना मुक्त वातावरणात राहण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण केली पाहिजे, असे पत्रकात श्री. कोतकर यांनी म्हटले आहे.
लोकनियुक्त नगरसेवक नसल्याने अहिल्यानगर महानगरपालिकेत सध्या प्रशासक राज आहे. आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांच्याकडे सर्व अधिकार आहेत. कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून त्यांनी ओळख निर्माण केली आहे. परंतु त्यांची कडक शिस्त मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करताना दिसून येत नाही. मोकाट कुत्र्यांमुळे शहर व उपनगरांतील नागरिक भयभीत झाले आहेत. रात्रीच्या वेळी बाहेर गावाहून येताना नगरकरांना चोर, दरोडेखोरांपेक्षा कुत्र्यांची भीती वाटते. आयुक्त साहेब अनेक वेळा रस्त्यावर उतरून कामे मार्गी लावतात. त्याची योग्य प्रसिद्धी होईल अशी व्यवस्था केली जाते, असेही श्री. कोतकर यांंनी पत्रकात म्हटले आहे.

आयुक्तांनी एकदा कोणताही लवाजमा न घेता शहर किंवा उपनगरांत एकट्याने रस्त्यावर फिरून दाखवावे. म्हणजे त्यांना मोकाट कुत्र्यांची दहशत दिसून येईल. मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी महापालिकेने कोणालाही काम द्यावे. तुमच्या पातळीवर निविदा प्रक्रिया राबवा; परंतु हा उपद्रव बंद करावा. पाणीपट्टीत वाढ करण्यासाठी तुम्ही खूप तत्परता दाखवली. तीच तत्परता नगरकरांना चांगल्या सुविधा देण्यासाठी दाखविली तर तुमचे कौतुकच होईल. येत्या आठ दिवसांत भटया कुत्र्यांचा बंदोबस्त न केल्यास आम्ही कुत्री पकडून आणून महापालिकेच्या आवारात सोडू असा इशारा मनोज कोतकर यांनी दिला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

कापडबाजारातील अतिक्रमण हटवा; अहिल्यानगर हिंदू समाज आक्रमक, दिला ‘हा’ इशारा

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - कापड बाजार, घास गल्ली, मोची गल्लीतील अतिक्रमण तातडीने हटविण्यासाठी...

धक्कादायक! नगर शहरात खासगी ट्राफीक शाखा!; पालकमंत्री, आ. जगताप यांच्या नाकावर टिच्चून लाखोंची वसुली!

एसपी साहेब, 'बोरसे' कडून होतोय तुमच्या नावाचा गैरवापर | 'तानवडे'सह अनेक खासगी एजंटांमार्फत बोरेसेची...

Breaking News : महिलांना २१०० रूपये देण्याच्या घोषणेवर न्यायालयाने दिला नकार; सांगितलं कि….

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - दिल्ली उच्च न्यायालयाने सोमवारी राष्ट्रीय राजधानीतील महिलांना दरमहा २,१०० रुपये...

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबत मोठी अपडेट, कारण आले समोर…

मुंबई / नगर सह्याद्री - स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये २७ टक्के ओबीसी आरक्षणाचा मुद्दा न्यायप्रविष्ट...