अहमदनगर। नगर सहयाद्री
जिल्ह्याभरात दुचाकींची चोरी करणाऱ्या टोळीला कोतवाली पोलिसांनी गजाआड केले आहे. त्याच्याकडून पाच लाख ५० हजारांच्या सहा दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. अमित अशोक नगरे व धनाजी ज्ञानदेव कुचेकर अशी आरोपीची नावे आहे.
७ डिसेंबर रोजी नगर शहरातील वैभव घोरपडे यांची दुचाकीला चोरीला गेल्याची फिर्याद कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. या गुन्ह्यासह कोतवाली हद्दीतूनचोरी गेलेल्या इतर दुचाकी चोरीच्या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांना माहिती मिळाली की, सदरील दुचाकी चोर हे सराईत असून ते विविध भागातून दुचाकी चोरतात व ते नेवासा तालुक्यातील आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचत दोघांना ताब्यात घेतले.अधिक चौकशी केली असता शहरातून महागड्या दुचाकी चोरून त्या शेतात, जंगलात किंवा डोंगराळ भागात लपवायच्या व काही दिवसांनी त्या कमी भावात विक्री करत असल्याची कबुली आरोपींनी दिली आहे.
सदरची कारवाई पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार तनवीर शेख, गणेश धोत्रे, योगेश भिंगारदिवे, शाहीद शेख, ए. पी. इनामदार, सलीम शेख, अतुल काजळे, अभय कदम, अमोल गाढे, संदीप थोरात, सुजय हिवाळे, सोमनाथ राऊत, वंदना काळे व दक्षिण मोबाईल सेलचे राहुल गुंडू आदीनी केली आहे.