spot_img
अहमदनगरMLA Rohit Pawar : आ. रोहित पवारांच्या संघर्षयात्रेवर लाठीचार्ज; समर्थकांनी घेतला मोठा...

MLA Rohit Pawar : आ. रोहित पवारांच्या संघर्षयात्रेवर लाठीचार्ज; समर्थकांनी घेतला मोठा निर्णय

spot_img

जामखेड | नगर सह्याद्री –
MLA Rohit Pawar : आ. रोहित पवार [NCP] यांच्या संघर्षयात्रेवर लाठीचार्ज केल्याच्या निषेधार्थ बुधवारी कर्जत जामखेड बंद ठेवण्याची हाक देण्यात आली होती. त्यानुसार जामखेड बंद ठेवण्यात आले. या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला.

कर्जत-जामखेडचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी पुणे जिल्ह्यातून सुरू केलेल्या युवा संघर्ष यात्रेचा काल मंगळवारी नागपुरात समारोप झाला. यावेळी युवांच्या विविध प्रश्नांबाबतचे निवेदन देण्यास विधान भवनावर जाऊ पाहणार्‍या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अडवत बळाचा वापर केल्याचा आरोप होत आहे.

पोलिसांनी यावेळी रोहित पवार यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. सरकारची ही दडपशाही असून याचा निषेध म्हणून आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट संतप्त झाला. आज बुधवारी जामखेड बंदची हाक जामखेड राष्ट्रवादीने दिली होती. जामखेड राष्ट्रवादीचे पदाधिकारी प्रा. मधुकर राळेभात, राजेंद्र कोठारी, दत्तात्रय वारे, सूर्यकांत मोरे, प्रकाश सदाफळ, विजय गोलेकर आदींनी बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले होते.

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पवार साहेबांच्या गोटात, ‌‘कुछ तो गड़बड़ है‌’!

शिवाजी शिर्के | नगर सह्याद्री दिल्लीत सध्या ज्या बैठकांचा जौर वाढला. त्यातून कुछ तो गडबड...

दुष्काळी महाराष्ट्राच्या पाण्यासाठी काम करणार; मुख्यमंत्री फडणवीस

पद्मश्री पोपटराव पवार यांनी केला सत्कार अहिल्यानगर | नगर सह्याद्री दुष्काळी महाराष्ट्राच्या पाण्यासाठी जास्त काम करणार...

नायलॉन मांजा विक्रेत्यांवर संक्रात; ‘ईतका’ मुद्देमाल जप्त

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- सर्जेपुरा येथील शेरकर गल्लीतील एका घरात विक्री करण्याच्या उद्देशाने नायलॉन मांजा...

शरद पवार-अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्र? कुटूंबातील सदस्याचे महत्वाचे विधान

Maharashtra politics News उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांची भेट घेऊन त्यांना वाढदिवसाच्या...