spot_img
अहमदनगरढगाळ वातावरण! कांदा उत्पादक चिंतेत; काय होणार परिणाम

ढगाळ वातावरण! कांदा उत्पादक चिंतेत; काय होणार परिणाम

spot_img

श्रीगोंदा | नगर सह्याद्री

श्रीगोंदा तालुयामध्ये कांदा काढणीचा हंगाम जोरात सुरू आहे. परंतु  सध्या ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. अचानक पाऊस पडला, तर कांद्याचे मोठे नुकसान होईल, या भीतीने शेतकरी चिंताग्रस्त आहेत.
यंदा श्रीगोंदा तालुयातील घुगलवडगाव, देऊळगाव, भानगाव, ढोरजा कोळगाव, आढळगाव, बेलवंडी या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात उन्हाळी कांद्याची लागवड झाली आहे.

सध्या सर्वत्र कांदा काढणी जोरात सुरू आहे. परंतु, दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण होत आहे. पाऊस पडण्याची शयता देखील दिसून येत आहे. तसेच काही भागांमध्ये पावसाच्या हलया सरी कोसळल्या आहेत. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकर्‍यांमध्ये कमालीची चिंता निर्माण झाली आहे.
शेतकर्‍यांनी काढलेला कांदा शेतामध्ये ठेवला आहे. परंतु, गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण झाल्याने शेतकर्‍यांनी तातडीने हा सगळा कांदा कांदा चाळीत साठवायला सुरुवात केली आहे. दुसरीकडे कांदा काढणीला मजूर मिळत नाही. त्यामुळे इतर जिल्ह्यांसह परराज्यांतून मजुरांना एकरी कांदा काढणे व साठवून ठेवण्याचे काम दिले जात आहे.

अवकाळी पाऊस झाल्यास कांद्याचे मोठे नुकसान
यंदाच्या वर्षी कांद्याला चांगला बाजार भाव मिळत असल्याने शेतकर्‍यांचा कांदा पिक घेण्याकडे कल वाढला आहे. सध्या कांदा काढणीला आला आहे. परंतु ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चिंतेत आहे. काढलेला कांदा भिजला तर मोठे नुकसान शेतकर्‍यांचे होणार आहे. अगोदरच कांद्याला बाजारभाव नाही, कांदा लागवड, कीटकनाशके-खते आणि आता काढणीचा खर्च, कोसळणारा बाजारभाव, आता निसर्गाची अवकृपा, आम्ही शेतकर्‍यांनी काय करायचे? असा सवाल घुगलवडगाव येथील शेतकरी राजू गलांडे यांनी व्यक्त केला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आमदार काशिनाथ दाते धावले शेतकऱ्यांच्या मदतीला; सरकारकडे केली मोठी मागणी

पारनेर । नगर सहयाद्री आधीच संकटात असलेल्या शेतकऱ्यांना गुरुवार (ता. ३) चक्रीवादळ, अवकाळी पाऊस व...

तिघांनी केली न्यायालयाची फसवणूक; नगरमध्ये अजब प्रकरण

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- खोटे संमतीपत्र व शपथपत्र सादर करून न्यायालयाची फसवणूक केल्याचा प्रकार...

चार जणांच्या टोळक्याचे युवकावर धारदार शस्त्राने सपासप वार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री :- एका युवकावर चार जणांनी धारदार शस्त्र व लाकडी दांडक्यांनी...

शिर्डीत दुहरी हत्याकांड! दरोडेखोरांनी बाप-लेकाला संपवल

Ahilyanagar Crime News: एकीकडे शिर्डीत रामनवमीच्या उत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. तर दुसरीकडे...