Fire News: एक मोठी बातमी समोर आली आहे. कपड्याच्या दुकानाला भीषण आग लागली असून यामध्ये दुकानाच्या वरच्या मजल्यावर राहणाऱ्या सात जणांचा गुदमरून मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये तीन महिला आणि दोन मुलांचाही समावेश आहे.
अधिक माहिती अशी: पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर शहरातील छावणी परिसरातील कापड बाजारातील कपड्याच्या दुकानीला आग लागली. या आगीमुळे दुकानाच्या वरच्या मजल्यावर राहणाऱ्या सात जणांचा गुदमरून मृत्यू झाला.
मृतकांमध्ये दोन मुले, दोन पुरूष आणि तीन महिलांचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली असून मृतदेह शासकीय घाटी रुग्णालयात पाठवण्यात आले असून पोलिसांकडून पंचनामा केला जात आहे.