spot_img
ब्रेकिंगAhmadnagar Breaking: गुलाबी थंडी आणि दाट धुके! नगरवर धुक्याची 'चादर', बळीराजा पुन्हा...

Ahmadnagar Breaking: गुलाबी थंडी आणि दाट धुके! नगरवर धुक्याची ‘चादर’, बळीराजा पुन्हा संकटात…

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री-

गुलाबी थंडी आणि दाट धुके!! असे मनमोहक वातावरण नगरकरांनी गुरुवारी अनुभवले. सकाळी दहा वाजेपर्यंत शहरासह सावेडी उपनगरामध्ये धुके होते. गुरुवारी सकाळी संपूर्ण शहरच धुयात हरवले होते. यंदाच्या मोसमातील या अनोख्या संधीचा अबालवृद्धांनी मनमुराद आनंद लुटला. दिल्लीगेट परिसर, लोखंडी पूल, सावेडी, केडगाव उपनगरांत दोन दिवसांपासून धुके दिसत आहे.

गेल्या आठवड़यापासून शहर व परिसरात हवामानात बदल होत आहे. याचा परिणाम म्हणून गुरुवारी पहाटेच्या वेळी धुयाची चादर पसरलेली दिसली. सकाळी सहा ते सात वाजण्याच्या दरम्यान घराबाहेर पडलेल्यांना धुयाची दुलई अनुभवण्याची संधी मिळाली. अनेकांनी मोबाइलमध्ये दृश्य टिपण्याचा प्ऱयत्न केला.

वाहनचालकांना रस्त्यांचा अंदाज येत नसल्याने नगर-मनमाड, नगर-पुणे, नगर-औरंगाबाद, अशा प्रमुख महामार्गांवरील वाहतूक संथगतीने सुरू होती. पंधरा ते वीस फुटांवरील घरे, वाहनेही धुयामुळे दिसत नव्हती. त्यामुळे वाहनांचे दिवे सुरू ठेवण्याशिवाय चालकांसमोर पर्याय नव्हता. पहाटे व्यायाम किंवा फिरायला जाणार्‍या नागरिकांनी धुयाचा आनंद घेतला.

पिकांवर परिणाम

दुष्काळ, अवकाळी पावसामुळे अगोदरच बळीराजा संकटात सापडला आहे. त्यातच सध्या पिकांवर धुक्याची चादर ओढवली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा धुक्यामुळे पिकांवर मोठा परिणाम होण्याची दाट शक्यता आहे. कांदा, फळ पिकांवर धुक्याचा मोठा परिणाम होत असतो. गुलाबी थंडी आणि दाट धुके असे वातावरण मनमोहक असले तरी शेतकर्‍यांसाठी मात्र हे धुके नुकसानकारक असल्याचे शेतकर्‍यांमधून सांगितले जाते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगर तालुक्यात बिबट्याची भीती; गावांना दिवसा वीज पुरवठा करावा

माजी सभापती अभिलाष घिगे, सरपंच भाऊसाहेब बहिरट यांची महावितरणकडे मागणी सुनील चोभे | नगर सह्याद्री गेल्या...

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं भिजतं घोंगडं; याचिकेवर ‘या’ तारखेला सुनावणी होणार

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - स्थानिक स्वराज्य संस्थामधील आरक्षणाच्या मर्यादेबाबत दाखल करण्यात आलेल्या याचिकेबाबत मोठी...

कांद्याला भावच नाही, शेतकऱ्याने काय केले पहा…

रांधेतील शेतकर्‍याने कांद्याला भाव नसल्याने पीक केले नष्ट पारनेर | नगर सह्याद्री गेल्या वर्षभरात कांद्याला सरकारने...

अजित पवार.. सगळ्यांचा नाद करा, पण अनगरकरांचा नाय!; महाराष्ट्रात राजकारण तापले, माफीनामा अन कोण काय म्हणाले..

माजी आमदारपुत्राचं उपमुख्यमंत्र्यांना आव्हान; सोलापुरात वातावरण तापलं सोलापूर | नगर सह्याद्री सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुयातील अनगर...