अहमदनगर। नगर सहयाद्री-
नगरकरांनो पाणी जरा जपून वापरा. कारण रकरखत्या उन्हाळ्यात पाण्याची समस्या बिकट बनत चालली आहे. त्यातच पाटबंधारे विभागाकडून आयुक्तांना पाणी कपातीचे पत्र आले आहे.
राज्यात यंदा पावसाने खूप कमी प्रमाणात हजेरी लावली. त्यामुळे सर्वदूर पाणी संकट उभे राहिले नागरिकांचे नागरिकांची हाल होत आहेत. त्यातच वाढत्या उष्णतेमुळे धरण परिसरातल्या पाण्यावर देखील परिणाम होतो आहे.
नगरकरांची तहान भागवणाऱ्या तलावातील पाणीसाठ्यावर परिणाम झाला आहे. वाढता उन्हाच्या तडाख्यामुळे या
धारणामधला पाणीसाठा देखील कमी होत चालला आहे. यामुळे संभाव्य पाणी टंचाई निवारणाकरिता नगरकरांच्या पाणी पुरवठ्यात २० टक्के कपात करण्याचा पाटबंधारे विभागाने निर्णय घेतला आहे.
महापालिकेच्या मंजूर कोट्यातुन ही पाणी कपात करण्यात आली असून ३१ जुलै २०२४ पर्यत काटकसरीने वापर करण्याबाबतचे पात्र पाटबंधारे विभागाने अहमदनगर महापालिका आयुक्तांना दिले आहे.