spot_img
ब्रेकिंगAhmednagar Today: नगरकरांनो महत्वाची बातमी! पुणे-नगर महामार्गावरील वाहतुकीच्या मार्गात बदल

Ahmednagar Today: नगरकरांनो महत्वाची बातमी! पुणे-नगर महामार्गावरील वाहतुकीच्या मार्गात बदल

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री-
नगर-पुणे महामार्गावरील भीमा कोरेगाव येथील शौर्य स्तंभाला अभिवादनासाठी १ जानेवारीला मोठी गर्दी होणार असल्याने बेलवंडी फाटा (ता. श्रीगोंदा) येथून पुण्याकडे जाणारी व नगरकडून सरळ पुण्याकडे जाणार्‍या सर्व प्रकारच्या वाहतुकीत बदल करण्यात आला. जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी याबाबत आदेश काढले आहेत. हा आदेश ३१ डिसेंबरला रात्री १२ ते २ जानेवारी सकाळी सहापर्यंत लागू असणार आहे.

नगर-पुणे महामार्गावरील बेलवंडी फाटा येथून पुण्याकडे जाणार्‍या वाहतुकीसाठी बेलवंडी फाटा-देवदैठण-पिंपरी कोळंडर-उक्कडगाव-बेलवंडी-नगर दौंड महामार्गावरून लोणी व्यंकनाथ-मढे वडगाव-काष्टी-दौंड-सोलापूर-पुणे महामार्गा मार्गे पुण्याकडे असा मार्ग असणार आहे.

नगरकडून सरळ पुण्याकडे जाणार्‍या वाहतुकीसाठी कायनेटीक चौक-केडगाव बायपास-अरणगाव बायपास-कोळगाव-लोणी व्यंकनाथ-मढेवडगाव-काष्टी-दौंड-सोलापूर पुणे महामागर्र् मार्गे पुण्याकडे असा मार्ग असणार आहे. नगरकडून पुणे मार्गे मुंबई, नवी मुंबई, ठाण्याकडे जाणार्‍या सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी कल्याण बायपास- आळेफाटा-ओतुर-माळशेज घाट असा मार्ग असणार आहे.

हा आदेश शासकीय वाहने, शौर्य स्तंभाला अभिवादनास जाणार्‍या नागरिकांची वाहने, रूग्णवाहिका, फायर ब्रिगेड व अत्यावश्यक कारणास्तव स्थानिक प्रशासनाने परवानगी दिलेल्या वाहनांना लागू राहणार नाही.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

​महापालिका निवडणूक: मतदार यादीचा ‘मुहूर्त’ पुन्हा लांबणीवर

​महापालिका निवडणूक: मतदार यादीचा ‘मुहूर्त’ पुन्हा लांबणीवर आता २० नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार प्रारूप यादी ​दुबार नावांचा...

डॉ. बोरगेंच्या अडचणी कायम ; साडेसोळा लाखांच्या अपहार प्रकरणी अधिक तपासाचे आदेश

डॉ. बोरगेंच्या अडचणी कायम ; साडेसोळा लाखांच्या अपहार प्रकरणी अधिक तपासाचे आदेश ९ फेब्रुवारीपर्यंत अहवाल...

अण्णासाहेब पाटील महामंडळात बोगस लाभार्थी; असे आले उघडकीस…

​बनावट कागदपत्रांद्वारे शासनाचा व्याज परतावा लाटला; दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल ​अहिल्यानगर / नगर सह्याद्री - मराठा...

बिहार तो झांकी है, अहिल्यानगर अभी बाकी है!

मिलिंद गंधे / शहर भाजपच्या वतीने बिहारच्या निवडणूक विजयाचा जल्लोष अहिल्यानगर / नगर सह्याद्री - बिहार...