spot_img
ब्रेकिंगमुख्यमंत्र्यांचे ठाकरेंना आव्हान ; मी अडीच वर्षाचं रिपोर्ट कार्ड सर्वांसमोर ठेवायला तयार,...

मुख्यमंत्र्यांचे ठाकरेंना आव्हान ; मी अडीच वर्षाचं रिपोर्ट कार्ड सर्वांसमोर ठेवायला तयार, हिंमत असेल तर तुम्हीसुद्धा ठेवा

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री –
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्यातील भाषणातून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर जोरदार टीका केली.’जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो’ ही गर्जना करून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे जेव्हा भाषणाची सुरुवात करायचे तेव्हा सर्वांच्या अंगावर काटा उभा राहायचा. ‘गर्व से कहो हम हिन्दू हैं’. ही सिंहगर्जना बाळासाहेबांनी सर्वांना दिली. काही जणांना आता हिंदू म्हणून घेण्याची लाज वाटू राहिली आहे. हिंदुहृदयसम्राट म्हणायला काही जणांची जीभ कचरू लागली आहे. पण आपल्याला हा शब्द उच्चारायला लाज नाही तर अभिमान आणि स्वाभिमान वाटतो, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

गारगोट्यांना आता लाज वाटतेय. बाळासाहेबांच्या विचारांशी बेईमानी करणाऱ्यांपासून शिवसेना आपण मुक्त केली. म्हणून आझाद शिवसेनेचा हा आझाद मेळावा आहे. येथे शिवसैनिकांचा जनसागर आला आहे. चारही बाजूंनी लोक येत आहेत. याठिकाणी भगवा उत्साह संचारल्याचे ते म्हणाले.

खरं म्हणजे, महाराष्ट्र विरोधी आघाडीला घरी पाठवून आपलं सरकार आलं. तेव्हा काही लोक म्हणत होते. हे सरकार 15 दिवस टिकणार नाही. एका महिन्यात पडेल. दुसऱ्या महिन्यात पडेल. सहा महिन्यात पडेल. पण टीका करणाऱ्यांना हा एकनाथ शिंदे परून उरला. जनतेच्या आशीर्वादाने आणि साथीने घासून नाही तर ठासून दोन वर्षे पूर्ण केली. कारण मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. तर आनंद दिघे साहेबांचा चेला आहे. असा जाणार नाही. मला हलक्यात घेऊ नका, असे त्यांनी विरोधकांना ठणकावून सांगितले.

आम्ही धारावीकरांच्या मागे ठामपणे उभे आहोत. धारावीकर यांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. रमाबाई आंबेडकर नगर आम्ही म्हणून एस आर आणि एम एम आर डी ए ला दिला आहे. तिथे 17000 घर आम्ही देणार आहोत.मुंबई जे रखडलेले प्रकल्प आहे ज्यांना भाडं मिळत नाही काही लोकांना मुंबईच्या बाहेर जावे लागले हे सर्व प्रकल्प सरकार घेणार आणि पूर्ण करणार. मुंबईकर न्याय देण्याचा प्रयत्न करू असे मुख्यमंत्री म्हणाले.

त्यांचे सगळे काळे धंदे बंद केले. आपण फेसबुकमध्ये नाहीतर फेस टू फेस काम करणारे कार्यकर्ते आहोत. बाळासाहेब ठाकरे म्हणायचे की, नेता घरात नाही तर कार्यकर्त्याच्या दारात चांगला दिसतो.मी मी उठाव केला नसता तर महाराष्ट्राचे चित्र असतं. सकाळ झाली मोर उठला. आंघोळ केली आणि मोरू पुन्हा झोपला. बाळासाहेबांच्या मागे अख्खी दिल्ली फिरायची आणि हा मुरू आता दिल्लीच्या मागे फिरतोय.मी आमच्या अडीच वर्षाचं रिपोर्ट कार्ड सर्वांसमोर ते ठेवायला तयार आहे तुम्ही सुद्धा तुम्ही दोन वर्षात काय केले ते हिम्मत असेल तर लोकांपुढे ठेवा, असे आव्हान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

कोरोनामध्ये खिचडी, कफन याच्यात पैसे कोणी खाल्ले ? मळ्याच्या टाळूवरचे लोणी खाणारे तुम्ही आहात. तुमच्या तोंडाला लागलेले शेण अशांनी लपणार नाही. इथे लोक मारत होती आणि तुम्ही पैसे मोजत होतात, असा आरोप त्यांनी विरोधकांवर केला. आम्ही पीपी चेक करून लोकांना मदत करत होतो हॉस्पिटलमध्ये जात होतो. तुम्ही घरात बसून करून मंत्री याला त्याला बाहेर, आमदार आला त्याला बाहेर…असं करत होता. तुम्ही काय केलं ते जाईल ते सांगू शकत नाही पण वेळ इथे योग्य वेळी मी ते सर्व सांगेन, असे ते म्हणाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

देवभाऊचं ठरलं; महाराष्ट्रात जल्लोष; सत्ता स्‍थापनेसाठी टोकाचे पाऊल…

मुंबई / नगर सह्याद्री - शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे, भाजप नेते देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे अध्यक्ष...

आमदार संग्राम जगताप यांचे मंत्रिपद फायनल; कोण काय म्हणाले पहा

शहराचे आमदार संग्राम जगताप यांना मंत्रिपद मिळावे यासाठी ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिर येथे...

मोठी बातमी; ब्रेक फेल झाल्याने बस थेट बसस्थानकातच घुसली

प्रवासी झाले जखमी; मोठा अनर्थ टळला पारनेर / नगर सह्याद्री पारनेर येथून मुंबईकडे जाणारी एसटी...

एकच भाऊ देवा भाऊ; गटनेतेपदी फडणवीसांची घोषणा होताच नगरमध्ये जल्लोष

देवेंद्र फडणवीस हे डायनामिक, सक्षम, प्रगतीशील नेतृत्व : अॅड. अभय आगरकर अहिल्यानगर / नगर सह्याद्री...