spot_img
अहमदनगरअहमदनगरमध्ये पाच महाविद्यालयांत चाणक्‍य कौशल्‍य विकास केंद्रांची सुरुवात ! पालकमंत्री विखे पाटील...

अहमदनगरमध्ये पाच महाविद्यालयांत चाणक्‍य कौशल्‍य विकास केंद्रांची सुरुवात ! पालकमंत्री विखे पाटील यांच्या प्रयत्नांना यश

spot_img

राहाता / नगर सह्याद्री : पालकमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍या पुढाकाराने जिल्‍ह्यात पाच चाणक्‍य कौशल्‍य विकास केंद्रांची सुरुवात झाली आहे. या पाचही केंद्रांचा प्रारंभ आज उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कौशल्‍य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्‍या उपस्थितीत दुरदृष्‍य प्रणालीने करण्‍यात आला.

नगर जिल्‍ह्यात नुकताच नमो महारोजगार मेळावा पार पडला. या मेळाव्‍यातच कौशल्‍य विकास केंद्राची उभारणी करण्‍याची घोषणा करण्‍यात आली होती. पालकमंत्री विखे पाटील यांच्‍या पाठपुराव्‍यामुळे जिल्हात पाच ठिकाणी चाणक्य कौशल्य विकास केंद्राचा प्रारंभ झाला आहे. यामध्‍ये शिर्डी साई रूरल इन्स्टिट्यूटच्या इंडस्ट्रियल ट्रेनिंग इस्टिट्युट राहाता, नगर येथील प्रेमराज सारडा महाविद्यालय, अहमदनगर कॉलेज, के.जे सोमय्या महाविद्यालय कोपरगाव, संजीवनी रुरल एज्‍युकेशन सोसायटी या महाविद्यालयांमध्‍ये हे केंद्र सुरु करण्‍यात आले आहे.

राहाता येथे झालेल्या या कार्यक्रमास प्रवरा ग्रामीण शिक्षक संस्थेचे संचालक ज्ञानदेव म्हस्के, गणेशचे माजी अध्यक्ष मुंकुदराव सदाफळ, सुरेशराव सदाफळ, संस्थेचे सह सचिव भारत घोगरे,डॉ.कल्हापुरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.शिवानंद हिरेमठ, अतांत्रिकचे संचालक डॉ.प्रदिप दिघे, प्राचार्य डॉ.सोमनाथ घोलप, कॅम्प संचालक डॉ.महेश खर्डे, आय.टी.आयचे प्राचार्य अर्जुन आहेर, सुनिल दंडवते, डॉ.संजय गुल्हाने, जिल्हा कौशल्य समन्वयक मच्छींद्र उकीडे आदी मान्यवर उपस्थित होते.

या कौशल्‍य विकास केंद्रातून विद्यार्थ्‍यांना आता मार्गदर्शना बरोबरच नोकरी मिळण्‍याच्‍या संधी, मुलाखती बाबतचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. बदलत्या शिक्षण पद्धतीने येणाऱ्या काळात कौशल्य आधारीत शिक्षणातून मोठी रोजगार निर्मीती होणार आहे. युवा शक्तीच्या जोरावर भारताची अर्थव्यवस्था ही मजबूत होऊन होण्यास मद्दत होणार आहे.कौशल्य विकास विद्यापीठाची स्थापना आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सर्वसमावेशक युवा धोरणामुळे भारतीय अर्थव्यवस्था बळकट होऊन याद्वारे युवकांना गरजेभिमुख कौशल्य प्राप्त होणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी सांगितले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

दोघांना बेदम मारहाण! कारण आलं समोर..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री जांबाच्या झाडाच्या फांद्यांवरून झालेल्या वादात दोघांना मारहाण केल्याची घटना कापुरवाडी (ता....

दारूची नव्हे दारू दुकानाचीच झाली चोरी!

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारपासून उपोषण | ‌‘ उत्पादन शुल्क‌’चे एसपी सोनोने यांच्यासह संगमनेरचे निरीक्षक आरोपीच्या...

आनंदी बाजार परिसरात गाळाचे साम्राज्य; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

अहिल्यानगर | नगर सह्याद्री"- शहरातील आनंदी बाजारात परिसरातील चितळे रोड, जिल्हा वाचनालय ते पटवर्धन चौक...

भावी नगरसेवकांना खुशखबर! पालिका निवडणुकांचा मार्ग मोकळा?

नवी दिल्ली | नगर सहयाद्री:- राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे....