पुणे। नगर सहयाद्री-
निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. निवडणूक आयोगाकडूनही जय्यत तयारी सुरू असून लवकरच लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनीही जोरदार तयारी सुरू केली आहे. दरम्यान महाराष्ट्रात सर्वच कंबर कसून तयारी केली असून कसबा पेठचे आमदार रविंद्र धंगेकरानी यांनी विरोधकांना आव्हानच केले आहे.
२५ वर्षे कसब्यात भाजपला कुणी या मतदारसंघात चितपट करू शकलं नाही. मात्र, काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांनी पोटनिवडणुकीत अशक्य ते शक्य केलं आणि रातोरात राज्यात धंगेकरांच्या ‘कसबा पॅटर्न’ ची चर्चा सुरू झाली. आता हेच रवींद्र धंगेकर पुन्हा चर्चेत आलेत. आता ते महाविकास आघाडीचे काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार म्हणून चर्चेत आहेत.याच पार्श्वभूमीवर रवींद्र धंगेकरांनीही लोकसभेची तयारी सुरू केली आहे.
पुणे लोकसभा निवडणूकांवरुन राजकारण तापले आहे. या आपल्याला पक्षानं जर उमेदवारी दिली तर आपण निवडून येणारच मग भाजपाने कोणताही उमेदवार उभा करावा असे चॅलेंज कॉंग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी दिले आहे. गेल्यावेळी चंद्रकांत दादांनी चुक केली होती. आता भाजपाचे जगदीश मुळीक तिच चुक करीत आहेत. कुणालाही कमी लेखू नये असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.